शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

व्हॉट्सअ‍ॅप डीपीमुळे उलगडले हार चोरीचे गूढ; आग्रीपाडा पोलिसांकडून मोलकरणीला बेड्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2018 03:46 IST

दीड वर्षांपूर्वी घरातून गायब झालेल्या ५ तोळ्यांच्या हाराचे गूढ व्हॉट्सअ‍ॅप डीपीमुळे उलगडल्याचा प्रकार आग्रीपाडामध्ये समोर आला. या प्रकरणी आग्रीपाडा पोलिसांनी रिटा गोराय (४०) नावाच्या मोलकरणीला अटक केली.

मुंबई : दीड वर्षांपूर्वी घरातून गायब झालेल्या ५ तोळ्यांच्या हाराचे गूढ व्हॉट्सअ‍ॅप डीपीमुळे उलगडल्याचा प्रकार आग्रीपाडामध्ये समोर आला. या प्रकरणी आग्रीपाडा पोलिसांनी रिटा गोराय (४०) नावाच्या मोलकरणीला अटक केली. तसेच पश्चिम बंगालमधून हार हस्तगत केला.लोअर परळ येथील कल्पवृक्ष इमारतीत तक्रारदार कुटुंबीय राहते. मालकीण घरातील दागिने पाहत असताना, ५ तोळ्यांचा हार गायब असल्याचे त्यांच्या लक्षात आले. घरात सर्वत्र शोधूनही हार न सापडल्याने, तसेच घरातील काही वस्तूही गायब झाल्याचे लक्षात आल्याने त्यांनी आग्रीपाडा पोलिसांत तक्रार दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सावळाराम आगवणे यांच्या नेतृत्वाखाली सहायक निरीक्षक नागेश पुराणिक, हवालदार सचिन खानविलकर यांनी तपास सुरू केला. घरातील चारही नोकरांचे मोबाइल तपासणीसाठी घेतले. तेव्हा रिटाच्या मोबाइलमध्ये तिच्या कुटुंबातील सर्वांचे डीपी दिसले. एका डीपीतील महिलेच्या गळ्यातील हार पाहून पोलिसांना संशय आला. त्यांनी तो फोटो मालकिणीला पाठविला. त्यांनी हार ओळखल्यानंतर पोलिसांनी रिटाला चौकशीसाठी ताब्यात घेतले.पोलिसी खाक्या दाखविताच, रिटाने गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांना ज्या महिलेच्या गळ्यात हार दिसला, ती पश्चिम बंगालमधील नक्षलग्रस्त खेड्यात राहणाऱ्या रिटाच्या भाच्याची पत्नी होती. रिटाने दीड वर्षांपूर्वी हार चोरून भाच्याच्या लग्नात त्याच्या पत्नीला भेट दिला होता.

टॅग्स :WhatsAppव्हॉट्सअॅपCrime Newsगुन्हेगारी