शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टार फुटबॉलर लिओ मेस्सी पोहोचला 'वनतारा'मध्ये; केली महाआरती, वन्य प्राण्यांमध्येही रमला!
2
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
3
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
4
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
5
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
6
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
7
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
8
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
9
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
10
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
11
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
12
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
13
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
14
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
15
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
16
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
17
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
18
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
19
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
Daily Top 2Weekly Top 5

'TRP घोटाळा' नक्की आहे तरी काय?... जाणून घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2020 20:35 IST

TRP Scam : काही चॅनल्सनी टीआरपी वाढवण्यासाठी रॅकेट चालवल्याचा आरोप मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केला आहे.

ठळक मुद्देदोन चॅनलच्या मालकांना तर पोलिसांनी अटक केली आहे. मात्र आता रिपब्लिक न्यूज चॅनलचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्याही विरोधात पोलिस कारवाई करतात का हे पाहणं महत्वाचे ठरेल.

टीव्ही चॅनल्सच्या उद्योगाला हादरवून सोडणारी बातमी आली आहे. देशातला टीव्ही वाहिन्यांच्या उद्योगाचा आकार हा ३० ते ४० हजार कोटींचा आहे. काही चॅनल्सनी टीआरपी वाढवण्यासाठी रॅकेट चालवल्याचा आरोप मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केला आहे.इंग्रजी येत नाही अशा व्यक्तींच्या घरी इंग्रजी चॅनलटीआरपी म्हणजेच टेलिव्हीजन रेटींग पॉईंट वाढवण्यासाठी काही चॅनल्सनी पैसे दिले आणि हे रॅकेट मुंबईपोलिसांच्या गुन्हे शाखेने उद्ध्वस्त केल्याचा दावाही मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी पत्रकार परिषदेत केला. या रॅकेटमध्ये दोन आरोपींना अटकही करण्यात आली आहे. या आरोपींनी ज्या घरांमध्ये टीआरपी मिटर लावले होते. त्या प्रेक्षकांना संपर्क साधून त्यांना विशिष्ट चॅनल पाहण्यासाठी बाध्य केलं गेलं. त्यांना पैसेही दिले गेले, असा आरोपही त्यांनी केला गेलाय. फक्त मराठी आणि बॉक्स सिनेमा या दोन कंपन्यांच्या मालकांना पोलिसांनी अटक केली आहे. ज्या घरांमध्ये इंग्रजी येत नाही, अशा घरांमध्येही इंग्रजी चॅनल लावण्यासाठी पैसे देण्यात आल्याचंही पोलिसांच्या निदर्शनास आलं आहे.

Breaking : खोट्या TRPचा पर्दाफाश! रिपब्लिक टीव्ही चौकशीच्या फेऱ्यात, दोन मराठी चॅनेलचे मालक अटकेत

टीआरपीनुसार जाहिरातीचा दरटीआरपीमध्ये वाढ झाल्यास त्याचा फायदा या चॅनल्सना जाहीरातीचे दर वाढवण्यात आणि व्यवसाय वाढवण्यात कामी येत असतो. आम्ही बीएआरसी या संस्थेच्याही संपर्कात आहोत आणि अधिक माहिती घेण्यात येत आहे. ही माहिती माहिती व प्रसारण मंत्रालयाला देण्यात येणार आहे. केंद्र सरकारच्या तपास यंत्रणांना तपास करण्याची विनंती करण्यात येणार असल्याचंही परमबीर सिंग यांनी म्हटलंय. बीएआरसी या टीआरपी मोजणाऱ्या संस्थेनी दिलेल्या अहवालानुसार या रिपब्लिक चॅनलच्या रेटिंगमध्येही अविश्वसनीय अशी वाढ दिसली आहे. त्यामुळे या चॅनलचाही या रॅकेटमध्ये सहभाग असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रिपब्लीक चॅनलचे संचालक आणि मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांनाही समन्स पाठवले जाण्याची शक्यता आहे आणि आजच हे समन्स जारी केले जाणार आहे. अधिक तपास केल्यानंतर गरज पडली तर रिपब्लिकच्या संचालकांनाही चौकशीसाठी बोलावलं जाईल, असंही परमबिर सिंग यांनी स्पष्ट केलं आहे. 

हा प्रकार उघडकीला आला तो एका हंसा नावाच्या संस्थेच्या एका माजी कर्मचाऱ्याला अटक केल्यानंतर... 

 

हंसा कंपनीकडे टीव्हीला बॅरोमिटर लावायचं काम दिलं होतं. हे मिटर लावतानाची जी काही माहिती असते ती गुप्त ठेवली जात असते. मात्र, काही ठिकाणी पैसे देऊन हे मिटर लावले जात असल्याचा आणि एक प्रकारचं रॅकेट यात काम करत असल्याची हंसाच्या एका माजी कर्मचाऱ्यांनी मुंबई पोलिसांना दिली. तक्रारींच्या आधारावर त्याला अटक करण्यात आली होती. सखोल तपास केला असता या कर्मचाऱ्याच्या खात्यात २० लाख रूपये असल्याचं आढळून आलं. तसंच त्याच्या बँक लॉकरमध्येही साडे आठ लाख रूपये असल्याचं निदर्शनास आलं. ही सगळी रक्कम जप्त करण्यात आल्याचंही पोलिस आयुक्तांनी सांगितलं. त्या माहितीच्या आधारे तपास करून मुंबई पोलिसांनी या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. टाईम्स नाऊच्या वरिष्ठ पत्रकार मेघा प्रसाद यांनी त्यांच्या लाईव्हमध्ये सांगितलं की, अशा प्रकारे टीआरपीमध्ये घोटाळा होत असल्याच्या तक्रारी या गेल्या ३ वर्षांपासून येत होत्या आणि अशा तक्रारी फक्त मुंबई पोलिसच नाही तर इतरही काही राज्यांच्या पोलिसांकडे आल्या होत्या. देशातल्या अशा भागांत अचानक घरांचे असे काही समुह उभे राहिले जिथे लोकसंख्या अत्यंत तुरळक होती. म्हणजे छत्तीसगड, झारखंड अशा राज्यांमध्ये मोठ्या संख्येनी बॅरोमिटर्स लावण्यात आले होते. 

काही चॅनलच्या टीआरपीमध्ये अचानक वाढ झाली होती. ती देखील काही विशेष काही न करत ... 

 

ज्या भागांत अत्यंत गरीब लोकं राहतात किंवा जिथे झोपडपट्टीसारखी वस्ती आहे.  त्या भागांत असे मिटर लावण्यात आले आणि त्या ठिकाणच्या लोकांना पैसे देऊन विशिष्ट चॅनल पाहायला लावले जात असल्याची माहिती पोलिसांपर्यंत पोहोचली होती. मुंबई पोलिसांनी हंसाच्या माजी कर्मचाऱ्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारावर तपास केला आणि या रॅकेटचा पर्दाफाश केला. विशेष मह्णजे ही पत्रकार परिषद गुरूवारी घेण्यात आली. गुरूवारीच बार्क या टीआरपी मोजणाऱ्या संस्थेचे देशभरातल्या चॅनलचे आकडे जाहीर केले जातात. त्यामुळे आजचाच दिवस निवडण्यात आला हे विशेष... सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रिपब्लीक टीव्हीच्या संचालकांना आणि संपादकांना मुंबई पोलिस समन्स बजावणार आहेत. आजच हे समन्स बजावलं जाणार आहे. यात अजून एक धक्कादायक बाब म्हणजे ज्या चॅनल्सनी अशा पध्तीनी कृत्रीम पध्दतीनी टीआरपी वाढवून जाहिराती मिळवल्या, त्या जाहीतींचा पैसा हा गुन्हा  समजला जाणार आहे. रिपब्लीक चॅनलचे पत्रकार या पत्रकार परिषदेला उपस्थित नव्हते. याचाच अर्थ अशा प्रकारची काही तरी घटना घडली याची पूर्वकल्पना रिपब्लीकच्या कर्मचाऱ्यांना आली असेल. नाही तर सुशांत सिंह प्रकरण सुरू असताना मुंबई पोलिस आयुक्त पत्रकार परिषद घेतात, तेव्हा आपला प्रतिनिधी त्या पत्रकार परिषदेला असायला हवा, अशा भावनेनी तिथे पत्रकार पाठवला असता. एकूणच या खळबळजनक पत्रकार परिषदेमुळे वृत्त वाहिन्यांच्या विश्वासाला प्रचंड मोठा तडा गेला आहे. दोन चॅनलच्या मालकांना तर पोलिसांनी अटक केली आहे. मात्र आता रिपब्लिक न्यूज चॅनलचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्याही विरोधात पोलिस कारवाई करतात का हे पाहणं महत्वाचे ठरेल. कारण ज्या दोन वाहिन्यांची नावं घेण्यात आली ती अत्यंत लहान होती. पोलिस मोठ्या मासांना कधी अटक करणार असा प्रश्न निर्माण होतो.

 

टॅग्स :Param Bir Singhपरम बीर सिंगMumbaiमुंबईPoliceपोलिसtrp ratingटीआरपीArrestअटकTRP Scamटीआरपी घोटाळा