शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

३२ वर्षानंतर कल्याण सत्र न्यायालयाचा निकाल; खून करणाऱ्या ७ आरोपींना जन्मठेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2019 16:32 IST

एका खुनाच्या गुन्ह्यासंदर्भात तब्बल ३२ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर कल्याण न्यायालयाने निर्णय देत सात आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

टिटवाळा :- कल्याण तालुका(टिटवाळा) पोलीस ठाण्यात सिआरपीसी १०३/८७ नुसार दाखल असलेल्या एका खुनाच्या गुन्ह्यासंदर्भात तब्बल ३२ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर कल्याण न्यायालयाने निर्णय देत सात आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

याबाबतचे सविस्तर वृत्त असे कि, कल्याण तालुक्यातील गेरसे गाव येथील राहणारे फिर्यादी नारायण दिवाणे यांच्या फिर्यादीनुसार मयत हरिभाऊ बाबु दिवाणे यांनी ग्रामपंचायतीच्या ताब्यातील तब्बल ११  एकर जमिनीसाठी ना हरकत दाखल न दिल्याचा राग मनात ठेवून आरोपी बाळू उर्फ लखा यशवंत गायकर (रा.वाशिंद),भाऊ धर्मा दिवाणे, लक्ष्मण शंकर दिवाणे, सुरेश आंबो गायकर, एकनाथ धर्मा दिवाणे (सर्व राहणार-गेरसे) यांनी पूर्व नियोजित कट व आपसात संगनमत करून गैरकायद्याची मंडळी जमवून तलवार, कुऱ्हाडी, काठ्या, ऍसिड बल्ब, सुरुंगाची काडतुसे घेऊन याचा वापर करून मयत हरिभाऊ बाबू दिवाणे व फिर्यादी नारायण दिवाणे यांच्यावर हल्ला केला होता.  

याप्रकरणी कल्याण तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा रजि नं. १०३/८७, से.के.न.६८/९६  तसेच पुरवणी दोषापत्र ९४/९६ भादंवि ३०२,३०७,३२६,३२४,१४७,१४८,१४९ भारतीय स्फोटक अधिनियम कलम ५(३) प्रमाणे दाखल असलेल्या गुन्ह्याचे अन्वेषण पो.उपनिरीक्षक भरत सरवदे (सध्या सेवानिवृत्त) यांनी उपरोक्त आरोपीविरुद्ध सबळ पुरावा संकलित करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. त्या सातही आरोपी विरुद्ध अपराध केल्याचा सबळ पुरावा सिद्ध झाल्याने सदरील आरोपीना कलम ३०२ नुसार जन्मठेप व प्रत्येकी १० हजार रुपये दंड ( दंड न भरल्यास १ वर्ष साधी कैद) तसेच भादंवि १४८ मध्ये २ वर्षे सक्त मजुरी व ५ हजार रुपये दंड (दंड न भरल्यास ६ महिने कैद) व भादंवि ३२४ मध्ये २ वर्षे सक्त मजुरी व ५ हजार रुपये दंड (दंड न भरल्यास ६ महिने कैद) अशी शिक्षा कल्याण सत्र न्यायालयाचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश अनिल सुब्रमण्यम यांनी सुनावली आहे. 

सदर केस मध्ये सरकारी वकील म्हणून गजानन चव्हाण तसेच मुख्य पैरवी अधिकारी म्हणून पोउपनिरी ए.एस.घनघाव,पो/हवा ४०७ एस बी कुटे,मपोशी परदेशी, मपोशी गोपाळे यांनी कोर्ट कर्मचारी व मपोना डी.डी.पाटील यांनी काम पाहिले.

टॅग्स :PoliceपोलिसArrestअटकCrime Newsगुन्हेगारीMurderखून