शहरं
Join us  
Trending Stories
1
इंग्लंड: लंडनच्या साऊथएन्ड विमानतळावर मोठा अपघात! उड्डाणानंतर काही वेळातच विमानाला आग
2
टीम इंडियासाठी सोपा वाटणारा पेपर झाला अवघड; ५८ धावांत ४ विकेट्स! KL राहुल एकटा पडला!
3
क्रॉसिंग गेटवर रेल्वेचे ‘झिरो अ‍ॅक्सिडेन्ट’चे लक्ष्य; मध्य रेल्वे नागपूर विभागात सुरक्षा मोहीम
4
"भाजपाने पेरलेल्या विषाला..."; प्रवीण गायकवाड प्रकरणावरून संजय राऊत यांनी व्यक्त केला संताप
5
IND vs ENG : वॉशिंग्टन सुंदरनं घेतली इंग्लंडची फिरकी; टीम इंडियासमोर १९३ धावांचे आव्हान
6
Video: बापरे!! पर्यटक समोर असताना चित्ता अचानक माणसांसारखा दोन पायांवर उभा राहिला अन्...
7
लातुरात ड्रग्ज विक्री नेटवर्कचा उलगडा! आणखी तिघांना अटक; चार दिवसांची पाेलिस काेठडी
8
दुर्गम जंगलातील खोल गुहेमध्ये २ मुलींसह सापडली रशियन महिला, विठ्ठल मूर्तीची करायची पूजा, तपासामधून धक्कादायक माहिती उघड  
9
IND vs ENG : अति 'सुंदर'! वॉशिंग्टनच्या फिरकीतील जादूसह टीम इंडियाच्या विजयातील मोठा अडथळा झाला दूर
10
नीरज चोप्रा अन् अरशद नदीम पुन्हा भिडणार; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिलीच लढत
11
ठाणे: जि.प., पं. समित्यांचा निवडणूक प्रभाग रचना मसुदा प्रसिद्ध; हरकतींसाठी २१ जुलैपर्यंत मुदत
12
भाजपाकडून खासदारकी मिळालेल्या उज्ज्वल निकम यांची संपत्ती किती? मुंबईत किती कोटींची घरं?
13
ब्रूकची आडवी-तिडवी फटकेबाजी! ३ चेंडूत कुटल्या १४ धावा; मग आकाशदीपनं 'मिडल स्टंप' उडवत घेतला बदला
14
"प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला करणाऱ्या गुंडांना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करा’’, काँग्रेसची मागणी  
15
जगद्गुरू अविमुक्तेश्वरानंद यांनी व्यक्त केली मराठी शिकण्याची इच्छा; शिंदेसेना देणार मराठीचे धडे
16
मोठी बातमी! संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाडांना अक्कलकोटमध्ये काळं फासलं
17
भारतीय लष्कराकडून पुन्हा एकदा ड्रोन स्ट्राईक, अनेक अतिरेकी ठार झाल्याचा दावा
18
युनूस सरकार बघ्याच्या भूमिकेत; ढाक्यात हिंदू व्यावसायिकाची निर्घृण हत्या; हल्लेखोर मृतदेहावर नाचले
19
रस्त्याने जात असताना कारवर पडले दगड, भयंकर भूस्खलनातून थोडक्यात बचावले माजी मुख्यमंत्री
20
रिंकू राजगुरूचा सिंपल पण स्टायलिश लूक, फोटो नाही तर कॅप्शनने वेधलं सर्वांच लक्ष

गाडी चालवतानाही मोबाइलप्रेम सुटेना; आठ महिन्यांत १५ हजार जणांना दंड

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2022 10:43 IST

दुचाकीवर तीन सीट बसविल्यास तसेच विनाहेल्मेट गाडी चालविल्यास एक हजार रुपये दंड आकारला जातो तसेच चालकाचे लायसन्स तीन महिन्यांसाठी रद्द केले जाते.

मुंबई : सुधारित मोटार वाहन कायद्यानुसार गाडी चालविताना मोबाइलवर बोलल्यास दुचाकीस्वाराला १ हजार रुपये तर मोठ्या गाड्यांच्या चालकांना ४ हजार रुपयांचा दंड आकारला जातो. दंडाची रक्कम वाढवूनही वाहनचालकांमध्ये तसूभरही फरक पडलेला नसल्याचे आढळून आले आहे. मोबाइलवर बोलत गाडी चालविणाऱ्या १५,१६५ जणांवर जानेवारी ते ऑगस्ट या आठ महिन्यांत कारवाई करण्यात आली आहे. 

दुचाकीवर तीन सीट बसविल्यास तसेच विनाहेल्मेट गाडी चालविल्यास एक हजार रुपये दंड आकारला जातो तसेच चालकाचे लायसन्स तीन महिन्यांसाठी रद्द केले जाते. अतिवेगाने गाडी चालविण्याबरोबरच वाहतुकीच्या नियमांची पायमल्ली, दुचाकीवरून अतिरिक्त प्रवासी वाहतूक इत्यादी गैरप्रकारांसाठी केंद्राने दंडाच्या रकमेत पाच ते दहा पटीने वाढ केली आहे. परंतु असे असूनही वाहनचालकांमध्ये बेशिस्तपणा आढळून येत आहे. 

मोबाइलवरील बोलणे कॅमेऱ्यात कैदबरेच वाहनचालक वाहन चालवताना बिनधास्तपणे मोबाइलवर बोलतात. काही ठिकाणी पोलीस नाहीत असे वाटते तर काही ठिकाणी वाहतूक पोलीस दिसले की, मोबाइल काढून खिशात ठेवतात, नंतर पुढे गेले की लगेच मोबाइलवर बोलणे सुरू होते. त्यामुळे कारवाईतून आपली सुटका झाली असा वाहनधारकांचा समज असतो. मात्र, प्रत्यक्षात तसे नसते. तुम्हांला आता न अडविताही मोबाइल कॅमेऱ्यातून पोलीस कैद करू शकतात. तसे प्रकार आता होऊ लागले आहेत.

हेल्मेटचा नियम नावालाचहेल्मेट न वापरणाऱ्या ८ लाख ८८हजार ५४८वाहनधारकांवर जानेवारी ते ऑगस्ट या आठ महिन्यांत कारवाई करण्यात आली आहे. त्यांना ४४ कोटी ४२ लाख ८१ हजार ५०० रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.

कोणत्या प्रकारात किती दंड वसुली?विना हेल्मेट दुचाकी चालविणे : ४,७०,७९,००० रु.सीट बेल्टचा वापर न करणे : ७८,८३,१०० रु.वाहन चालवताना मोबाइलचा वापर : ३४,८२,५०० रु.

कोणत्या वाहनाला किती दंडदुचाकी /तीन चाकी - १००० रु.चारचाकी वाहने - २००० रु.मोठी वाहने (ट्रक) - ४००० रु.

टॅग्स :traffic policeवाहतूक पोलीस