शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

वर्ध्यात गोबरगॅसच्या खड्ड्यात ११ मानवी कवट्या अन् ५४ हाडे; अल्पवयीन मुलीचे गर्भपात प्रकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2022 06:54 IST

अल्पवयीन मुलीचे गर्भपात प्रकरण; दाेन परिचारिकांना अटक

देऊरवाडा/आर्वी (जि. वर्धा)  : अल्पवयीन मुलीच्या गर्भपात प्रकरणाचा तपास करणाऱ्या पाेलिसांना गुरुवारी धक्का बसला. ज्या हाॅस्पिटलमध्ये गर्भपात करण्यात आला, त्याच्यामागे असलेल्या जागेत खाेदकाम करताना बुधवारी पाच मानवी कवट्या, रक्तरंजित कपडे आणि गर्भपिशवी सापडली होती. त्यानंतर गुरुवारी परिसरातील गाेबर गॅसच्या खड्ड्याची पाहणी केली असता, त्यातूनही छाेट्या बालकांच्या कवट्या आढळल्या.

आतापर्यंत एकूण ११ मानवी कवट्या, ५४ हाडे, गर्भपिशवी आणि रक्तरंजित कपडे पाेलिसांनी जप्त केले. यामुळे राज्यभर खळबळ उडवून देणाऱ्या बीडमधील ऊसताेड महिला कामगारांच्या गर्भपिशव्या काढण्याच्या तसेच सांगलीतील भ्रुण हत्या प्रकरणाच्या कटू स्मृती जाग्या झाल्या.या प्रकरणात गर्भपात करणाऱ्या डॉ. रेखा कदम यांना मदत करणाऱ्या दोन परिचारिकांनादेखील अटक केली असून आता या प्रकरणातील आरोपींची संख्या पाच झाली आहे. याबाबत पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर यांनी माहिती दिली.

संगीता काळे (३८) आणि पूनम दशरथ दाहट (४५) अशी अटक केलेल्या परिचारिकांची नावे आहेत. दोघींचीही कारागृहात रवानगी केली. डॉ. रेखा कदम हिने ३० हजार रुपयांत बेकायदेशीर गर्भपात केल्याचे उघडकीस आल्यानंतर आर्वी पोलिसांनी जलदगतीने तपास करत डॉ. रेखासह अल्पवयीन मुलाच्या आई-वडिलांना अटक केली. 

रुग्णालय संचालिकेला घेतले ताब्यात

आर्वी येथील कदम हॉस्पिटलच्या संचालिका डॉ. शैलजा कदम यांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले. मात्र, त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती तपास अधिकारी ज्योत्स्ना गिरी यांनी दिली.

तपासासाठी विशेष पथकाची नियुक्ती

प्रकरणाच्या सखोल तपासासाठी पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर यांनी विशेष पथकाची नियुक्ती केली आहे. या प्रकरणात आणखी काहींना ताब्यात घेणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षकांनी दिली असून, हे प्रकरण पुढे काय वळण घेते याकडे आता लक्ष लागले आहे.

पोलीस अधीक्षकांकडून रुग्णालयाची पाहणी

अधीक्षक होळकर, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत सोळंकी, सहायक पोलीस निरीक्षक महेंद्र इंगळे यांनी गुरुवारी आर्वी येथील कदम हॉस्पिटलला भेट देऊन पाहणी केली. ज्यात कवट्या व हाडे सापडली, ते बायोगॅस चेंबर, परिसरातील विहिरींचीही पाहणी त्यांनी केली. या रुग्णालयाला सील लावण्याची शक्यता असल्याची माहिती पुढे आली आहे.

परळीच्या धर्तीवर सुरु होता भ्रूणहत्येचा काळाबाजार

राज्यभर गाजलेल्या परळी येथील स्त्रीभ्रूणहत्या प्रकरणानंतर आर्वी येथेही अल्पवयीन पीडितेच्या गर्भपातानंतर पोलीस तपासामध्ये रुग्णालय परिसरातून मानवी कवट्या आणि हाडे सापडल्याने या रुग्णालयात भ्रूणहत्येचा काळाबाजारच सुरू असल्याचे आता स्पष्ट झाले आहे.  

अहवाल सादर करा : चाकणकर

कदम हॉस्पिटलमध्ये जी घटना उघडकीस आली ती अतिशय धक्कादायक आणि डॉक्टरी पेशाला, तसेच माणुसकीला काळिमा फासणारी आहे. या प्रकरणात आणखी काही व्यक्तींचा सहभाग आहे का, याबाबतची चौकशी करून केलेल्या कारवाईचा अहवाल राज्य महिला आयोगाच्या कार्यालयाकडे सादर करावा, अशा सूचना महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी पोलीस अधीक्षक होळकर यांना पाठविलेल्या पत्रात केल्या आहेत.

अवशेष पाठवणार डीएनए तपासणीला

पोलिसांनी रुग्णालयामागे असलेल्या बायोगॅस खड्ड्यातून उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. हेमंत पाटील व दोन शासकीय पंच, अल्पवयीन मुलीची आई, डॉ. नीरज कदम यांच्या उपस्थितीत हाडांचे अवशेष आणि मानवी कवट्यांसह इतर बाबी जप्त केल्या. त्या फाॅरेन्सिक लॅब येथे डीएनए तपासणीला पाठविण्यात आल्याची माहिती आहे.

टॅग्स :Deathमृत्यूPoliceपोलिस