शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदींना जिरेटोप घातल्याने वादंग; टीकेनंतर प्रफुल्ल पटेलांनी शिवप्रेमींना दिला 'हा' शब्द
2
इंडिया आघाडीला किती जागा मिळतील? काँग्रेस नेत्याने थेट आकडाच सांगितला; पहिल्यांदाच केला विजयाचा दावा
3
'अजितदादांना सोबत घेतल्याने भाजपचा मतदार नाराज झाला, पण...'; देवेंद्र फडणवीसांचे मोठं विधान
4
सांगलीच्या निर्णयात घाई केली; भाजपा प्रवेशाबाबत विश्वजित कदमांचं मोठं विधान
5
SBI'ने ग्राहकांना दिली भेट! एफडीवरील व्याजदरात केली मोठी वाढ, पाहा नवे दर
6
प्रकाश आंबेडकरांचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला; "तुमच्याकडे कुठली वॉशिंग मशिन..."
7
Corona Virus : चिंताजनक! भारतात आला कोरोनाचा नवा व्हेरिएंट; 'ही' आहेत लक्षणं, लोकांसाठी किती धोकादायक?
8
तुमच्या स्मार्टफोनसाठी कोणता स्क्रीन गार्ड बेस्ट; 50 रुपयांपासून मिळतात, पण...
9
Mallikarjun Kharge : "जनतेने घेतला मोदींची पाठवणी करण्याचा निर्णय, इंडिया आघाडी 4 जूनला सरकार स्थापन करणार"
10
१०० वर्षांनी अद्भूत त्रिग्रही योग: ५ राशींना शुभ, धनलाभाची संधी; नोकरीत प्रगती, उत्तम काळ!
11
Durgashtami : दर महिन्यातील दुर्गाष्टमीला 'या' चुका आवर्जून टाळा; होऊ शकतात विविध अपाय!
12
LIC Big News: 'या' वृत्तानंतर एलआयसीच्या शेअरमध्ये जोरदार तेजी, गुंतवणूकदारांच्या उड्या
13
RR vs PBKS : राजस्थान रॉयल्सचा प्ले ऑफसाठी 'सराव', सॅमसनच्या संघासमोर पंजाब किंग्सचे आव्हान
14
नरेंद्र मोदी VS राहुल गांधीः कुणाकडे जास्त संपत्ती? किती सोनं, किती कॅश? कुठे आहे गुंतवणूक? जाणून घ्या सर्वकाही
15
प्रफुल्ल पटेलांनी मोदींना जिरेटोप घातल्याने नवा वाद; भाजप म्हणतं, 'यात त्यांचा काय दोष?'
16
मोठा नफा कमावण्यासाठी शेअर बाजारात Investment करताय? गुंतवणूक करताना 'या' सात चुका टाळा!
17
चंदू चॅम्पियन येतोय! कार्तिक आर्यनच्या सिनेमाचं पहिलं पोस्टर रिलीज, चाहत्यांमध्ये उत्सुकता
18
मुस्लीम संसदेत पोहचला पाहिजे ही तुमची जबाबदारी; प्रकाश आंबेडकरांचं समाजाला आवाहन
19
जिथं मोदी जातील तिथं मविआ जिंकेल, संजय राऊतांचा दावा; भाजपावरही साधला निशाणा
20
ज्योतिरादित्य शिंदेंना मातृशोक; राजमाता माधवी राजेंचे दिल्ली एम्समध्ये निधन

सावधान! Video कॉलवर सेक्स करणार का?; व्हॉट्सअपवर मेसेज आला असेल तर...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2022 10:43 AM

व्हॉट्सअपवर एका अज्ञात नंबरवरून हायचा मेसेज आला. त्यानंतर त्याला रिप्लाय दिला.

नवी दिल्ली - एका प्रसिद्ध युवा डॉक्टरच्या निवृत्त झालेल्या वडिलांनी लज्जास्पद आणि घाबरलेल्या स्थितीत फोन करून मी बर्बाद झालोय, मी मरतोय असं म्हटलं. मुलानं कठीण प्रसंगात त्यांना रोखलं आणि हा प्रकार उघडकीस आला. अश्लील व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून फसवणूक करणाऱ्या टोळीची धमकी अन् त्यातून आत्महत्या करण्यापर्यंत घडलेला धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पीडित व्यक्तीकडे २० लाखांची मागणी करण्यात आली. त्यातील ५ लाखांची रक्कम व्यक्तीने दिली होती. 

सध्या अशाप्रकारच्या फसवणुकीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. विना अपहरण, दरोडा न घालता समोरील व्यक्तीला घाबरवून त्याच्याकडून पैशांची वसूली केली जाते. व्हॉट्सअपवर अनोळखी मुलीचा मॅसेज येतो. या मुलीच्या डिपीला सुंदर फोटो असतो. तिने मेसेज केल्यानंतर त्याला रिप्लाय दिला जातो. मग हळूहळू संवाद सुरू होतो त्यातून फोटो, व्हिडिओ शेअरिंग केली त्यानंतर ब्लॅकमेलिंगचा खेळ सुरू होतो. एका हिंदी दैनिकाच्या रिपोर्टरनं या प्रकाराचं स्टिंग ऑपरेशन केले आहे. जवळपास २ तास चॅट आणि न्यूड व्हिडिओचा प्रकार सुरू होता. 

व्हॉट्सअपवर मेसेज आला अन्...

व्हॉट्सअपवर एका अज्ञात नंबरवरून हायचा मेसेज आला. त्यानंतर त्याला रिप्लाय दिला. मग त्यानंतर व्हिडिओ कॉलवर सेक्स करोगे क्या? असा मेसेज आला. सेक्सटॉर्शनचा शिकार बनवण्यासाठी व्हिडिओ कॉलवर चेहरा महत्त्वाचा असतो.

आरोपी - व्हिडिओ कॉलवर सेक्स करणार का? 

रिपोर्टर - हे काय असतं?

मग व्हिडिओ कॉल आल्यानंतर रिपोर्टरनं फोनचा कॅमेरा साइडला केला. स्क्रीनवर एक मुलगी दिसते ती तिचा अदा दाखवत असते. त्यानंतर काही क्षणात हा कॉल कट होतो. 

रिपोर्टर - तुमचा फोटो पाठवा, व्हिडिओ कॉलमध्ये स्पष्ट दिसत नाही. 

आरोपी - लाल रंगाच्या कारसमोर लाल साडीत उभ्या असणाऱ्या महिलेचा फोटो पाठवतो. त्यानंतर पुन्हा व्हिडिओ कॉल येतो. आरोपी म्हणतो तुमचा चेहरा दाखवा

रिपोर्टर - तुम्ही खूप सुंदर दिसता माझा चेहरा पाहून तुम्ही कॉल बंद कराल

आरोपी - तुम्ही तुमचा चेहरा दाखवा, मी तुमच्याशी बोलेन

त्यानंतर व्हिडिओ कॉलवर समोरील मुलगी तिचा चेहरा न दाखवता अश्लील चाळे करत असते. 

आरोपी - तुमचा चेहरा दाखवा

रिपोर्टर - माझा चेहरा चांगला नाही, तुमच्याशी बोलायला आवडतंय. 

आरोपी - तुमचा चेहरा दाखवा, मला मज्जा येत नाहीये. 

रिपोर्टर चेहरा दाखवत नाही म्हणून समोरून व्हिडिओ कॉल कट केला जातो. 

त्यानंतर रिपोर्टर - फोन कट का केला, प्लीज असं करू नका

आरोपी - मला तुम्ही तुमचा चेहरा दाखवत नाही, त्यामुळे मला आवडत नाहीये. बाय

काही वेळाने पुन्हा व्हिडिओ कॉल येतो. त्यात न्यूड अवस्थेत मुलगी तिचा चेहरा न दाखवता अश्लील चाळे करत राहते आणि सांगते तुमचा चेहरा दाखवा. 

रिपोर्टर चेहरा दाखवत नसल्याने समोरून शिवीगाळ करण्यात येते. चेहरा दाखवण्यासाठी दबाव येतो. त्यानंतर समोरील कॉलवरून जेन्ट्सचा आवाज ऐकायला येतो. तेव्हा तुम्ही जेन्ट्स आहात असं रिपोर्टर विचारतो. तेव्हा समोरून कॉल कट केला जातो. 

अनेक राज्यात पसरलंय जाळंदिल्ली पोलीसचे स्पेशल सेल इंटेलिंजेस फ्यूजनचे डीसीपी केपीएस मल्होत्रा यांनी म्हटलं की, सेक्सटॉर्शन गँग फेसबुकच्या माध्यमातून बनावट फोटो बनवून पीडितांना शिकार बनवतात. व्हॉट्सअपवर व्हिडिओ कॉल करत सेक्सची मागणी करतात. त्यानंतर हा व्हिडिओ रेकॉर्ड करून समोरच्या ब्लॅकमेल करतात. बनावट पोलीस अधिकारी, यूट्यूबर बनून पैशांची मागणी करतात. जर पैसे देण्यास नकार दिला तर व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली जाते. त्याप्रकारे दिल्लीसह देशातील अनेक राज्यात ही टोळी अनेकांना जाळ्यात ओढते. 

टॅग्स :Policeपोलिस