शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

डीसीपी पठाण यांच्या याचिकेवर उत्तर दाखल करण्यासाठी मागितली मुदत

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2021 10:50 IST

हायकोर्टात राज्य सरकारची मागणी. राज्य सरकारने उत्तर दाखल केल्यावर आम्हालाही उत्तर दाखल करावे लागेल. तोपर्यंत पठाण यांना अटक न करण्याचे निर्देश द्यावेत, असे पठाण यांचे वकील नितीन प्रधान यांनी न्यायालयाला सांगितले.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई :  भ्रष्टाचारप्रकरणी मरिन ड्राईव्ह पोलीस ठाण्याने दाखल केलेला गुन्हा रद्द करण्यात यावा, यासाठी पोलीस उपायुक्त अकबर पठाण यांनी उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर उत्तर देण्यास राज्य सरकारने बुधवारी मुदत मागितली.

पठाण यांनी दाखल केलेल्या याचिकेवर उत्तर देण्यासाठी आम्हाला वेळ हवा आहे, अशी विनंती राज्य सरकारतर्फे ज्येष्ठ वकील डी. खंबाटा यांनी न्या. एस. एस. शिंदे व न्या. एन. जे. जमादार यांच्या खंडपीठाला केली.राज्य सरकारने उत्तर दाखल केल्यावर आम्हालाही उत्तर दाखल करावे लागेल. तोपर्यंत पठाण यांना अटक न करण्याचे निर्देश द्यावेत, असे पठाण यांचे वकील नितीन प्रधान यांनी न्यायालयाला सांगितले.

राज्य सरकारला ९ सप्टेंबरपर्यंत उत्तर देण्याचे निर्देश देत न्यायालयाने या याचिकेवरील पुढील सुनावणी १३ सप्टेंबर रोजी ठेवली.मरिन ड्राईव्ह पोलीस स्टेशन पोलिसांनी बिल्डर श्यामसुंदर अगरवाल, पठाण, परमबीर सिंह व अन्य सहा जणांवर भ्रष्टाचारप्रकरणी गुन्हा नोंदवला आहे. तक्रारीनुसार, अगरवाल यांच्यावर मकोकाअंतर्गत गुन्हा नोंदवण्यात येऊ नये, यासाठी सिंह, पठाण व अन्य अधिकाऱ्यांनी त्यांच्याकडून ५० लाख रुपये व भाईंदर येथे टूबीएचके फ्लॅट मागितला.

पठाण यांनी हा गुन्हा कायद्याचे उल्लंघन करून दाखल करण्यात आल्याचे याचिकेत म्हटले आहे. अगरवाल याचे अंडरवर्ल्डशी संबंध आहेत आणि त्या तपासाला हानी पोहोचावी, यासाठी आपल्यावर गुन्हा नोंदवण्यात आल्याचे याचिकेत म्हटले आहे.पठाण अद्याप पोलीस उपायुक्त आहेत. त्यामुळे त्यांच्यावर थेट गुन्हा दाखल केला जाऊ शकत नाही. ते सरकारी कर्मचारी असल्याने गुन्हा नोंदवण्यापूर्वी त्यांची प्राथमिक चौकशी करायला हवी, असा युक्तिवाद पठाण यांच्यावतीने ॲड. नितीन प्रधान यांनी न्यायालयात केला.अगरवाल यांच्यावर १९ फौजदारी गुन्हे नोंदविण्यात आले आहेत, असे पठाण यांनी याचिकेत म्हटले आहे.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार