शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
2
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
3
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
4
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
5
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
6
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
7
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
8
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
9
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
10
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
11
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
12
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
13
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
14
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
15
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
16
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
17
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
18
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
19
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक
20
एकनाथ शिंदेंच्या त्रासाला कंटाळून नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये जाणार होते!; ठाकरे गटाचा दावा

वानखेडेंनी मागितले २५ कोटी; साैदा ठरला १८ काेटींमध्ये; आर्यन खानप्रकरणी सीबीआयचा एफआयआर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2023 07:00 IST

२५ कोटी रुपयांचा हा सौदा १८ कोटींवर निश्चित झाला आणि त्यापैकी ५० लाख रुपये या प्रकरणात पंच असलेल्या किरण गोसावी आणि सॅम्युअल डिसोझा यांनी स्वीकारले. मात्र, नंतर ते ५० लाख परत केले, असे सीबीआयने नमूद केले आहे.

मुंबई : कॉर्डिलिया क्रूझवरील छापेमारीदरम्यान अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन याला अटक केल्यानंतर नार्कोटिक्स कन्ट्रोल ब्यूरोचे (एनसीबी) तत्कालीन विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या इशाऱ्यावरून किरण गोसावी आणि सॅम्युअल डिसोझा यांनी शाहरुख खानकडे २५ कोटी रुपयांची लाच मागितल्याचा उल्लेख सीबीआयने याप्रकरणी दाखल केलेल्या एफआयआरमध्ये केला आहे. तसेच, २५ कोटी रुपयांचा हा सौदा १८ कोटींवर निश्चित झाला आणि त्यापैकी ५० लाख रुपये या प्रकरणात पंच असलेल्या किरण गोसावी आणि सॅम्युअल डिसोझा यांनी स्वीकारले. मात्र, नंतर ते ५० लाख परत केले, असे सीबीआयने नमूद केले आहे.

याप्रकरणी सीबीआयने दाखल केलेल्या एफआयआरमध्ये वानखेडे यांच्यावर गैरव्यवहाराचे अनेक आरोप ठेवण्यात आले आहेत. २ ऑक्टोबर रोजी कॉर्डिलिया क्रूझवर झालेल्या छापेमारीदरम्यान २७ लोकांची नावे पुढे येऊनही त्यातील केवळ १० जणांनाच अटक करण्यात आली. तसेच, याप्रकरणी पंचनामा करण्यासाठी किरण गोसावी आणि सॅम्युअल डिसोझा यांना छापेमारीच्या कारवाईत सहभागी करून घेतले. एवढेच नव्हे, तर छापेमारीनंतर आरोपींना किरण गोसावी याच्या गाडीतून एनसीबीच्या कार्यालयात आणण्यात आले. गोसावी हा एनसीबीचाच अधिकारी असल्याचे भासवण्याचा प्रयत्न करण्यात आला. याखेरीज, छापेमारीनंतर गोसावी याला एनसीबीच्या कार्यालयात मुक्तप्रवेश होता. तिथे त्याने आर्यन खान याच्यासोबत सेल्फी काढले, व्हॉइस नोट रेकॉर्ड केल्या. छापेमारीनंतर खासगी पंचाला संबंधित कार्यालयात प्रवेश देणे हे नियमांच्या विरुद्ध असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. 

समीर वानखेडे यांच्यावरील आरोप-  आर्यन खानला या प्रकरणात न गोवण्यासाठी २५ कोटी मागणे.-  छापेमारीदरम्यान २७ लोकांची नावे पुढे आली होती. मात्र, केवळ १७ लोकांना कोणत्याही लेखी नोंदीशिवाय सोडून दिले.-  १० जणांनाच अटक केली.-  अरबाज मर्चंट याला अमली पदार्थ दिल्याचा आरोप असलेल्या सिद्धार्थ शहा या व्यक्तीलादेखील कोणत्याही तपासणी व चौकशीशिवाय तेथून जाऊ दिले.-  वानखेडे हे विरल रंजन नावाच्या एका व्यक्तीसोबत महागड्या घड्याळ्यांच्या खरेदी-विक्रीचा व्यवहार करतात. याची कोणतीही माहिती त्यांनी सरकारला किंवा त्यांच्या विभागाला दिली नाही.-  वानखेडे यांच्या परदेशी प्रवासाचा हेतू त्यांनी नीट सांगितला नाही.-  परदेशी प्रवास खर्चात तपशीलदेखील चुकीच्या पद्धतीने सादर केला. 

तक्रार कशी झाली? --  कॉर्डिलिया क्रूझवरील छापेमारीनंतर वानखेडे व त्यांच्या पथकावर आरोप झाले होते. या आरोपांची चौकशी करण्यासाठी एनसीबीने २५ ऑक्टोबर २०२१ रोजी एका विशेष चौकशी पथकाची स्थापना केली होती. -  या चौकशी समितीच्या पडताळणीत समोर आलेल्या मुद्यांच्या अनुषंगाने एनसीबीच्या दक्षता पथकाचे अधीक्षक कपिल यांनी केंद्रीय गृहमंत्रालयाच्या परवानगीनंतर ११ मे २०२३ रोजी वानखेडे व त्यांच्या पथकाची चौकशी करण्याची लेखी विनंती सीबीआयला केली. 

टॅग्स :Sameer Wankhedeसमीर वानखेडेAryan Khanआर्यन खानbollywoodबॉलिवूडCBIगुन्हा अन्वेषण विभाग