शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

बारच्या टॉयलेटमध्ये मित्रासोबत गेली, वादात महिला पोलिसाचा तोडला दात, दादरमधील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2023 06:21 IST

याप्रकरणी दादर पोलिसांनी  बदलापूरच्या क्षितिजा शिरोडकर (२५) या महिलेला अटक केली आहे.

मुंबई : दादरमधील एका नामांकित बारच्या टॉयलेटमध्ये मित्रासोबत गेल्याने बारच्या वेटरने हटकल्याचा राग आल्याने महिलेने वेटरसह मॅनेजरला शिवीगाळ करत बारमध्येच गोंधळ घालण्यास सुरुवात केली. महिलेला समजावण्यासाठी गेलेल्या महिला पोलिसांनाही केस ओढून बेदम मारहाण केली. या मारहाणीत एका महिला उपनिरीक्षकाचा दात तुटला आहे.

याप्रकरणी दादर पोलिसांनी  बदलापूरच्या क्षितिजा शिरोडकर (२५) या महिलेला अटक केली आहे. ती एका नामांकित बँकेत मॅनेजर पदावर काम करते. दादर पोलिस ठाण्यातील पोलिस उपनिरीक्षक गौरी दाते (३८) यांच्या तक्रारीनुसार पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. त्या निर्भया अधिकारी आहेत.

बुधवारी दादर परिसरात कर्तव्यावर असताना, सायंकाळी ७ च्या सुमारास एका बारमध्ये भांडण सुरु असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार, दाते पथकासह हॉटेलमध्ये गेल्या. तेव्हा, एक महिला आणि पुरुष वाद घालताना दिसून आले. चौकशीत दोघेही एकत्र बाथरूममध्ये जात असल्याने वेटरने त्यांना हटकले. रागात तिने वाद घालण्यास सुरुवात केल्याचे समजले. 

‘त्यात काय चूक?’पोलिसांनी महिलेकडे विचारणा करताच तिने दारूच्या नशेत, पोलिसांनाच शिवीगाळ सुरू केली. शिवीगाळ करत माझी पोलिस आयुक्तांपर्यंत ओळख आहे. सीपीना कॉल लावते. तुमची नोकरी घालवते म्हणत, शिवीगाळ सुरु केली.  तिला गाडीत बसवले. ती पुन्हा खाली उतरली. माझ्या मित्रासोबत बाथरूमला गेली त्यात काय चूक असे बोलून तिचा गोंधळ सुरूच होता.

 क्षितिजाला पोलिस ठाण्यात येण्यास सांगताच तिने दाते यांची कॉलर पकडून केस पकडले.  तेवढ्यात तिने डोक्याने त्यांच्या तोंडावर मारले. त्यात, महिला पोलिसाचा दात तुटला. गोंधळी महिलेला आवरण्याचा प्रयत्न करताच तिने आणखी मारहाण केली.  महिला पोलिसाने मदतीसाठी ओरड करताच, एका सहकारी महिलेने पुढाकार घेतला महिलेने त्यांनाही धक्काबुकी केली.  अखेर, दोघांनी मिळून क्षितिजाला गाडीत बसवले. गाडीतही तिने मारहाण केली. वैद्यकीय तपासणीच्या वेळेसही तिने गोंधळ घातला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी