शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

चोरी करून धूम ठोकणाऱ्यांना नदीतून पोहत केले जेरबंद; पोलिसांचा सिनेमा स्टाइल थरार...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2023 08:42 IST

भंगारावर मारला डल्ला, ग्रामस्थांच्या मदतीने पाठलाग

लोकमत न्यूज नेटवर्क, वाडा : एका खासगी कंपनीत चोरी सुरू असल्याचे समजताच घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांच्या येण्याची चाहूल लागताच बिथरलेल्या चोरट्यांनी पोलिसांवरच हल्ला करून धूम ठोकली. मात्र, पोलिसांनीही हार न मानता त्यांचा पिच्छा पुरवला. दोन किलोमीटरपर्यंत हे सुरूच होते. दोन किलोमीटरपर्यंत थरारक पाठशिवणीचा खेळ सुरूच होता. पळणाऱ्या चोरट्यांनी पुढे नदी दिसताच त्यात झोकून देत पळण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या मागावर अलेल्या पोलिसांनीही क्षणाचाही विलंब न लावत नदीत उड्या घेतल्या. पोहत जाऊन अखेर चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या.

भंगारावर मारला डल्ला 

हा थरार एखाद्या सिनेमाप्रमाणे होता. वाड्यातील मेट गावाच्या हद्दीत ग्रामस्थांनी याचि देही याचि डोळा असा हा थरार अनुभवला. सोमवारी (दि. २१) चारच्या सुमारास हा सगळा प्रकार घडला. पोलिसांनी या कारवाईत कंपनीतील लोखंडी भंगारावर डल्ला मारणाऱ्या रवाब शहा (वय ६०), मेरानूर शहा (२९), वैभव जाधव (२४), अब्दुल शहा (३८) आणि चिराग पाटील (२२) यांना अटक  करून कर्तव्य निभावतानाच धाडसाची वाहवा मिळवली.

ग्रामस्थांच्या मदतीने पाठलाग

मेट गावच्या हद्दीत असलेल्या मेटाफिल्ड काॅइल प्रा. लिमिटेड या बंद असलेल्या कंपनीतील लोखंडी भंगार सामानावर चोरटे डल्ला मारत असल्याची गोपनीय माहिती कुडूस पोलिसांना मिळताच त्यांनी तेथे धाव घेत धाड टाकली. यावेळी चोरट्यांनी तेथून पळ काढला. त्यानंतरही पोलिसांनी ग्रामस्थांच्या मदतीने त्यांचा पाठलाग करीत त्यांना ताब्यात घेतले.

...आणि पोलिसांनी नदीत उडी घेतली

पोलिस आल्याचे समजताच चोरट्यांनी प्रथम: पोलिसांवर हल्ला चढवला. यात दोन पोलिस किरकोळ जखमी झाले. पोलिस निरीक्षक सुरेश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने ही कारवाई केली. चोरट्यांनी नदीत उड्या टाकल्यानंतर पोलिस हवालदार चेतन सोनावणे यांनी प्रथम नदीत उडी घेऊन चोराला पकडले. त्यानंतर दुसऱ्या पोलिसाने चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या.

टॅग्स :riverनदीPoliceपोलिस