गुवाहाटी: संशयित अतिरेक्यांनी गुरुवारी रात्री आसामच्या दिमा हसाओ जिल्ह्यातील डायंगब्राजवळ सात ट्रक जाळल्या. या घटनेत पाच ट्रक चालकांचा जळून मृत्यू झाला आहे. या घटनेवेळी अतिरेक्यांनी अनेग गोळ्याही झाडल्या. सूचना मिळताच, पोलीसांनी घटनास्थळी दाखल होऊन जळालेल्या ट्रकमधून पाच मृतदेह बाहेर काढले. राजधानी गुवाहाटीपासून सुमारे 200 किमी अंतरावर ही घटना घडली.
आसाम पोलिसांनी सांगितल की, या घटनेमागे दिमासा नॅशनल लिबरेशन आर्मी (DNLA) या अतिरेकी गटाचा हात आहे. या घटनेनंतर परिसरात मोठ्या प्रमाणात शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे. आरोपींना पकडण्यासाठी आसाम रायफल्सची मदत घेतली जात आहे.
आसाम आणि मिझोरामच्या सीमा वादामुळे हिंसाचार
काही दिवसांपूर्वी आसाम आणि मिझोरममधील सीमा वादात 5 पोलिसांसह 6 जण ठार झाले होते. दोन्ही राज्यांतील पोलिस आणि नागरिकांमध्ये चकमक झाली. दोन्ही बाजूंकडून लाठीचार्ज करण्यात आला होता. पण, जेव्हा प्रकरण वाढलं तेव्हा पोलिसांनी अश्रुधुराच्या गोळ्या झाडल्या. दरम्यान, गोळीबारही झाला. हिंसाचारानंतर आसाम आणि मिझोराम सीमेवर सीआरपीएफला तैनात करण्यात आलं होतं.
मे महिन्यात 7 डीएनएलएचे अतिरेकी ठार
यापूर्वी मे महिन्यात आसाम रायफल्स आणि राज्य पोलिसांच्या संयुक्त कारवाईत सात डीएनएलए अतिरेकी ठार झाले होते. नागालँडच्या सीमेला लागून असलेल्या पश्चिम कर्बी आंगलाँग जिल्ह्यात ही चकमक झाली. सुरक्षा दलांना येथे अतिरेकी लपल्याची माहिती मिळाली होती. या दरम्यान अतिरेक्यांनी गोळीबार सुरू केला. प्रत्युत्तरा 7 बदमाश ठार झाले. यासह, त्याचे दोन साथीदार चकमकीत गंभीर जखमी झाले होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ठार झालेल्या दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात दारुगोळा आणि 4 एके 47 जप्त करण्यात आल्या होत्या.