शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
2
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
3
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
5
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
6
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
7
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
8
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
9
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
10
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
11
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
12
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
13
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
14
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
15
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
16
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
17
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
18
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
19
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
20
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला

पिंपरीत वाहनांची तोडफोड करत माजविली दहशत, सहा जणांवर गुन्हा दाखल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2019 16:28 IST

परिसरातील वाहनांची कोयता, लोखंडी रॉड व लाकडी दांडक्याने तोडफोड करत दहशत माजविली.

पिंपरी : नागरिकांना शिवीगाळ करीत रस्त्यावर उभ्या असलेल्या वाहनांची तोडफोड करत दहशत माजविल्याप्रकरणी सहा जणांच्या टोळक्यावर सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना मंगळवारी रात्री सव्वा अकराच्या सुमारास पिंपळे गुरव येथे घडली. ललिता राजाभाऊ फुले (वय ३२, रा. राधिका बिल्डिंग, लक्ष्मीनगर, पिंपळे गुरव) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार आश्विन चव्हाण (पूर्ण नाव व पत्ता माहित नाही) व इतर चार ते पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पिंपळे गुरव, लक्ष्मीनगर येथील गल्ली नंबर ८ येथे मंगळवारी रात्री सव्वा अकराच्या सुमारास आश्विन चव्हाण याच्यासह चार ते पाच जणांचा जमाव जमला. नवनाथ माझी टीप पोलिसांना देतो त्याचे परिणाम काय होतात ते आता मी दाखवतो, असे म्हणत आरोपींनी फिर्यादीला व येथील रहिवाशांना शिवीगाळ केली. तसेच परिसरातील वाहनांची कोयता, लोखंडी रॉड व लाकडी दांडक्याने तोडफोड करत दहशत माजविली. दरम्यान, ललिता फुले यांच्या गळ्यातील ४० हजार रुपये किंमतीची सोनसाखळी हिसकावून नेली. याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस