शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

मुले चोरणारी टोळी समजून गावकऱ्यांचा महिलांना चोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2019 06:25 IST

अनैतिक संबंध शोधण्यासाठी पत्नीने आपल्या दोन मैत्रिणींसह बुरखा घालून पतीचा फिल्मी स्टाइलने पाठलाग केला खरा, मात्र मुले पळविणारी टोळी असल्याचा संशय घेत या तीनही महिलांना गव्हाण येथील नागरिकांनी चांगलाच चोप दिला.

उरण : अनैतिक संबंध शोधण्यासाठी पत्नीने आपल्या दोन मैत्रिणींसह बुरखा घालून पतीचा फिल्मी स्टाइलने पाठलाग केला खरा, मात्र मुले पळविणारी टोळी असल्याचा संशय घेत या तीनही महिलांना गव्हाण येथील नागरिकांनी चांगलाच चोप दिला. गव्हाण गावात बुधवारी रात्री घडलेल्या या प्रकाराची न्हावा-शेवा बंदर पोलिसांत नोंद करण्यात आली आहे.नवी मुंबईत मुख्याध्यापिका, शिक्षिका, व्यवस्थापक म्हणून या तिघी काम करतात. त्यांच्यापैकी एकीच्या पतीचे गव्हाण गावातील विवाहित महिलेशी संबंध आहेत. तिला समजवायला या तिघी पतीचा पाठलाग करीत गव्हाण गावात पोहोचल्या. त्यांनी महिलेच्या मुलाचा फोटो आणला होता. तो फोटो लोकांना दाखवून त्या महिलेचा पत्ता शोधत होत्या. घर सापडल्यावर त्यांचे या महिलेबरोबर भांडण झाले. ते बघण्यासाठी गावातील महिला जमा झाल्या. महिलांचा गराडा पाहून या तिघी घाबरून पळू लागल्या. गावातील महिलांनी त्यांचा पाठलाग केला. अख्खा गाव त्यांचा पाठलाग करू लागला. त्यांना पकडून तपासणी केली असता त्यांच्याजवळ मुलाचा फोटो सापडल्याने ग्रामस्थांना त्या मुले पळविणाºया टोळीतील असल्याचा संशय आला. खातरजमा न करता महिलांसह गावकऱ्यांनीही त्यांना नाहक मारहाण सुरू केली. न्हावा-शेवा पोलिसांना समजल्यानंतर त्यांनी गावात येत त्यांची सुटका करण्याचा प्रयत्न केला. मात्र ग्रामस्थांनी पोलिसांना न जुमानता मारहाण करणे सुरूच ठेवले. पोलिसांनी समजाविल्यावर गावकºयांनी त्यांना पोलिसांच्या ताब्यात दिले. चौकशीत खरी घटना उघडकीस आली. पोलिसांनी त्यानंतर रात्री अडीचच्या सुमारास त्यांना सोडले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीRaigadरायगड