शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
4
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
5
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
6
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
8
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
9
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
10
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
11
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
12
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
13
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
14
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
15
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
16
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
17
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
18
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
19
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
20
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
Daily Top 2Weekly Top 5

Satish Kaushik Death : 'रशियन तरुणींना बोलावून सतीश कौशिकला ...'; विकास मालूच्या पत्नीचा धक्कादायक खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2023 18:22 IST

Satish Kaushik Death : अभिनेता आणि दिग्दर्शक सतीश कौशिक यांच्या मृत्यूप्रकरणी नवीन खुलासा झाला आहे.

Satish Kaushik Death : अभिनेता आणि दिग्दर्शक सतीश कौशिक यांच्या मृत्यूप्रकरणी नवीन खुलासा झाला आहे. उद्योगपती विकास मालू यांच्या पत्नीने धक्कादायक आरोप केले आहेत. यामुळे आता सतीश कौशिक मृत्यू प्रकरणी खळबळ उडाली आहे.

अभिनेते सतीश कौशिक  यांच्या मृत्यूबाबत महिलेने तिचा उद्योगपती पती विकास मालूच्या भूमिकेवर शंका उपस्थित केली आहे. दिल्ली पोलिसांना दिलेल्या तक्रारीत विकास मालूने सतीश कौशिक यांच्याकडून १५ कोटी रुपये गुंतवणुकीसाठी घेतल्याचा दावा करण्यात आला आहे. कोरोनाच्या काळात जेव्हा पैसे बुडले तेव्हा त्याने सतीश कौशिकला मार्गातून दूर करण्याचा कट रचला. दिल्लीचे पोलीस आयुक्त संजय अरोरा यांना पाठवलेल्या तक्रारीत,  विकास मालूच्या दुसऱ्या पत्नीने आरोप केले आहेत. 

अभिनेत्री भाग्यश्री मोटेच्या बहिणीचा संशयास्पद मृत्यू, अपघात की घातपात? पोलीस तपास सुरू

तक्रारीत लिहिले की, “माझा १३ मार्च २०१९ रोजी विकास मालूशी कायदेशीर विवाह झाला होता. विकासनेच माझी ओळख अभिनेता आणि दिग्दर्शक सतीश कौशिक यांच्याशी करून दिली.

"२३ ऑगस्ट २०२२ रोजी सतीश कौशिक दुबईतील आमच्या घरी आले होते. यादरम्यान, त्यांनी विकासकडे त्यांचे १५ कोटी रुपये परत मागितले. त्यावेळी मीही तिथे उपस्थित होते. यावरून वाद झाला. सतीश कौशिक सांगत होते की त्यांना पैशाची नितांत गरज आहे. सतीश यांनी विकासला तीन वर्षांपूर्वी कुठेतरी गुंतवणूक करण्यासाठी १५ कोटी रुपये दिले होते. पण विकासने कोणतेही पैसे परत दिले नाहीत.", असंही तक्रारीत म्हटले आहे. 

"माझे पती विकास मालू यांनी त्यावेळी सतीश कौशिक यांना पैसे परत करणार असल्याचे सांगितले होते. त्याच रात्री मी पती विकास यांना या पैशा संदर्भात विचारले होते, यावेळी विकास म्हणाले, "त्यांनी १५ कोटी रुपये दिले आहेत, जे कोरोनाच्या काळात बुडाले. मग मी त्यांना विचारले की आता तुम्ही काय करणार, तेव्हा विकास म्हणाला, एखाद्या दिवशी रशियन मुलीला बोलावून सतीश कौशीकला निळ्या गोळ्यांचा ओव्हरडोज देईन. याच पद्धतीने त्याला मारेन, असंही तक्रारीत म्हटले आहे.

महिलेने पुढे सांगितले की, "दुसऱ्या दिवशी म्हणजेच २४ ऑगस्ट २०२२ रोजी सतीश कौशिक यांनी पुन्हा त्यांच्याकडे १५ कोटी रुपये मागितले, तेव्हा विकास मालू संतापला. यावेळी विकासने सतीशला सांगितले की, तुम्हाला एकदा सांगितले होते की नुकसान झाले आहे, भारतात जा मी पैसे परत करीन, जास्त आवाज करू नका. तुम्ही १५ कोटी रोख दिले आहेत. तुम्ही कोणतीही कायदेशीर कारवाई करू शकत नाही, असंही विकास मालू यांच्या पत्नीने आपल्या तक्रारीत म्हटले आहे.  (Satish Kaushik Death )

टॅग्स :Satish Kaushikसतीश कौशिकCrime Newsगुन्हेगारी