शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
6
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
7
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
8
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
9
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
10
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
11
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
12
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
13
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
14
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
15
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
16
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
17
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
18
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
19
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
20
Latest Marathi News LIVE: डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

हत्येच्या एक दिवस आधी केलेली मारहाण विजयच्या जिवावर बेतली, पूर्वीचा वाद कारणीभूत असल्याचा पोलिसांचा अंदाज

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2021 11:40 IST

विजय नवलगिरे याचा ११ महिन्यांपूर्वी अंबरनाथ पश्चिम भागातील बालाजीनगर परिसरातील दर्शना नावाच्या मुलीसोबत प्रेमविवाह झाला होता.

अंबरनाथ: अंबरनाथ बी केबिन रोड परिसरात भरदिवसा विजय नवलगिरे या तरुणाची हत्या गुरुवारी त्याच्या पत्नीसमोरच करण्यात आली. नेमका हा प्रकार का घडला? याचा पोलीस शोध घेत आहेत. त्यातच पोलिसांच्या तपासात एक बाब समोर आली आहे की हत्येच्या एक दिवस आधी विजयने आरोपीसोबत भांडण करून त्याला मारहाण केल्यामुळे वाद वाढला होता. याच वादातून आरोपीने ही हत्या केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.विजय नवलगिरे याचा ११ महिन्यांपूर्वी अंबरनाथ पश्चिम भागातील बालाजीनगर परिसरातील दर्शना नावाच्या मुलीसोबत प्रेमविवाह झाला होता. विजय आणि याच परिसरात राहणाऱ्या आरोपींचे पूर्वीपासून वाद असल्याने त्यांच्या मनात या प्रेमविवाहामुळे आणखी संताप वाढला होता. त्यातच गेल्या वर्षी रामू कोली याचे ताडीचे दुकान विजयने बंद पाडले होते. त्याचादेखील राग आरोपींच्या मनात होता. हे सर्व सुरू असतानाच १२ मे रोजी विजय आणि आरोपी जगदीश उर्फ जग्गू मुंगर यांच्यात वादावादी होऊन मारहाण झाली होती. याच मारहाणीचा बदला घेण्यासाठी आरोपींनी थेट विजय याचे घर गाठले. घराचे दार बंद असताना त्यांनी लाथा मारून दरवाजा तोडला. घरात जाताच विजयच्या डोळ्यावर स्प्रे मारून त्याला ओढत इमारतीखाली आणले. यादरम्यान विजयची पत्नी वाचविण्याचा प्रयत्न करीत होती. मात्र, आरोपी मद्यधुंद अवस्थेत असल्याने त्यांनी मिळेल त्या वस्तूने विजयवर हल्ला केला. एवढेच नव्हेतर, त्याला फरफटत नेत त्याच्या डोक्यावर दगड टाकला.आदल्या दिवशी झालेल्या भांडणाचा राग काढण्यासाठी हे सर्व आरोपी एकत्रित आले होते. आरोपी कालिदास कोली, जग्गू मुंगर, सोनू स्वामी, रामू कोली, राजू निंदी, आनंद, चिंटू, जयेश आणि एका अनोळखी इसमाने ही हत्या केली. ही हत्या करताना आरोपीने पेव्हर ब्लॉक आणि सिमेंटच्या ठोकळ्याचा वापर केला. एका आरोपीने स्वतःच्या ताब्यातील कटरच्या साह्याने विजयच्या मानेवर वार केले होते. 

आरोपींना पाच दिवसांची पोलीस कोठडीया प्रकरणी पोलिसांनी पाच आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये कालिदास कोली, जग्गू मुंगर, सोनू स्वामी, रामू कोली आणि जयेश यांचा समावेश आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसambernathअंबरनाथthaneठाणे