शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

भाजपा नेत्याने पत्नी आणि 2 मुलांसह घेतलं विष; चौघांचा मृत्यू, धक्कादायक कारण आलं समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2023 11:53 IST

संजीव मिश्रा हे भाजपा विदिशा नगर मंडळाचे उपाध्यक्ष होते.

मध्य प्रदेशातील विदिशा येथून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. येथे भाजपाच्या एका नेत्याने पत्नी आणि दोन मुलांसह विष घेतलं आहे. यामुळे कुटुंबातील चारही जणांचा मृत्यू झाला आहे. विदिशातील या भाजपा नेत्याचे नाव संजीव मिश्रा आहे. आपल्या दोन मुलांच्या आजाराने ते हैराण झाले होते. याच कारणावरून त्यांनी पत्नी व दोन मुलांसह विष घेतलं. यानंतर संपूर्ण कुटुंबाचा मृत्यू झाला. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

भाजपाचे विदिशा मंडल प्रमुख सुरेंद्र सिंह चौहान यांनी सांगितले की, विदिशाच्या बंटी नगर भागात राहणारे संजीव मिश्रा हे भाजपा विदिशा नगर मंडळाचे उपाध्यक्ष होते. ते भाजपाचे माजी नगरसेवकही होते. गुरुवारी संध्याकाळी सहाच्या सुमारास संजीव मिश्रा यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली. ज्यामध्ये त्यांनी सांगितले की, देवाने शत्रूच्या मुलांना हा ड्यूशेन मस्क्युलर डिस्ट्रॉफी (डीएमडी) आजार देऊ नये.

हा प्रकार पाहिल्यानंतर संजीव मिश्रा यांच्या ओळखीचे लोक त्यांच्या घरी पोहोचले असता त्यांना 45 वर्षीय संजीव, त्यांची पत्नी नीलम मिश्रा आणि दोन मुले अनमोल आणि सार्थक बेशुद्धावस्थेत आढळले. यानंतर सर्वांना तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले, तेथे कुटुंबातील चारही सदस्यांचा मृत्यू झाला.

विदिशाचे डीएम उमाशंकर भार्गव म्हणाले की, संजीव मिश्रा यांच्या दोन्ही मुलांना डीएमडी नावाचा अनुवांशिक आजार आहे, त्यावर कोणताही इलाज नाही. घटनास्थळी एक सुसाईड नोट सापडल्याचेही त्यांनी सांगितले. ज्यात संजीव मिश्रा यांनी लिहिले आहे की, ते आपल्या मुलांना वाचवू शकत नाही, त्यामुळे त्याला आता जगायचे नाही. या प्रकरणाचा अधिक तपास सुरू करण्यात आला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

 सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBJPभाजपा