शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

Video : समीर वानखेडेंच्या खबऱ्याच्या जीविताला धोका; पोलिसांकडे केली संरक्षणाची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2021 18:06 IST

Sameer Wankhede : कोऱ्या पेपरवर सह्या घेऊन खबऱ्याला बनवले पंच 

ठळक मुद्देहे प्रकरण उघडकीस आल्याने आपल्या जीवाला धोका असून त्यांनी पोलीस संरक्षणाची मागणी केली आहे. या प्रकरणातील पंच शेखर कांबळे यांनी त्याचा उलगडा केला आहे.

नवी मुंबई : एनसीबीने खारघर येथे नायझेरियन विरोधात केलेली कारवाई बनावट असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणातील पंच शेखर कांबळे यांनी त्याचा उलगडा केला आहे. दरम्यान हे प्रकरण उघडकीस आल्याने आपल्या जीवाला धोका असून त्यांनी पोलीस संरक्षणाची मागणी केली आहे.

आर्यन खान प्रकरणानंतर अडचणीत आलेले एनसीबीचे मुंबई विभागीय अधिकारी समीर वानखेडे यांच्या अडचणीत अधिक भर पडली आहे. त्यांच्या टिमने खारघर येथे केलेल्या कारवाईत पंच म्हणून असलेल्या खबऱ्याने ती कारवाई बनावट असल्याचे म्हंटले आहे. समीर वानखेडे यांच्यासाठी खबऱ्याचे काम करणाऱ्या शेखर कांबळे यांनी त्याठिकाणी एक नायझेरियन व्यक्ती ड्रग्स घेऊन येणार असल्याची माहिती दिली होती. मात्र कारवाईवेळी सदर नायझेरियन व्यक्तीने तिथून पळ काढला होता. यानंतर हे पथक एका ठिकाणी गेले असता, त्याठिकाणावरून दोन नायझेरियन व्यक्तींना पकडून एनसीबी कार्यालयात नेले होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी कांबळे यांना कार्यालयात बोलावून पंच म्हणून कोऱ्या कागदावर सह्या घेतल्या होत्या. यावेळी आपण कोऱ्या कागदावर सह्या घेत असल्याबाबत आक्षेप घेतला असता, काही होणार नाही याची हमी देण्यात आली होती. मात्र नुकतेच या कारवाईची माहिती उघड झाल्यानंतर पंच म्हणून आपला नोंदवलेला जबाब खोटा असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. कोणत्याही ड्रग्स शिवाय पकडलेल्या व्यक्तीकडे ६० ग्रॅम एमडी सापडल्याचा जबाब सही घेतलेल्या कोऱ्या कागदावर नोंदवण्यात आल्याचाही खुलासा त्यांनी केला आहे.

हे प्रकरण उघडकीस येऊ लागल्याने मंगळवारी रात्री एनसीबी कार्यालयातून अनिल माने यांनी फोन करून आपल्याला भेटीसाठी बोलावल्याचेही सांगितले. मात्र कारवाईचा बनाव उघड झाल्याने आपल्या जीविताला भीती असल्याने एनसीबी कार्यालयात जायचे टाळले असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यामुळे कोपर खैरणे पोलीस ठाण्यात उपस्थित राहून त्यांनी पोलिसांकडे अर्ज दिला आहे. त्यामध्ये स्वतःला व कुटुंबाला पोलीस संरक्षणाची मागणी केली आहे.

दहा ते बारा कोऱ्या कागदावर सह्या घेतल्या.

खारघरच्या कारवाईच्या निमित्ताने आपल्याला एनसीबी कार्यालयात बोलवून घेतल्यानंतर त्याठिकाणी आपल्याकडून दहा ते बारा कोऱ्या कागदांवर सह्या घेतल्याचे कांबळे यांनी सांगितले. त्यासाठी समीर वानखेडे व अनिल माने यांनी भाग पाडल्याचाही आरोप केला आहे. त्यापैकी एका कागदाचा वापर खारघच्या कारवाईसाठी झाला असून, इतर कागद देखील काही कारवाईसाठी पंच म्हणून वापरले गेले असल्याची भीती त्यांनी व्यक्त केली आहे.

टॅग्स :NCBनार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोSameer Wankhedeसमीर वानखेडेPoliceपोलिसNavi Mumbaiनवी मुंबईDrugsअमली पदार्थ