शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

Video : पत्नीची हत्या करून मृतदेह ठेवला घरात लपवून; पतीचा आत्महत्येचा प्रयत्न  

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2019 17:06 IST

पतीने दोन्ही हाताच्या नसा कापून केला आत्महत्येचा प्रयत्न 

ठळक मुद्दे दारु पिण्यास विरोध करत असल्याच्या कारणावरुन दोघांचे नोव्हेंबर २०१८ पासून भांडण होते.याप्रकरणी वडाळा टी. टी. पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल असून आरोपी पती संजयकुमार भटेल पडीहारी (२९) याला अटक करण्यात आली आहे.

मुंबई - दारू पिण्यास विरोध करत असल्याने पत्नी वारंवार विरोध करत असल्याने पटीने तिला अमानुष मारहाण करत तिची हत्या केली. धक्कादायक माहिती अशी की, पत्नीची हत्या करून आरोपी पतीने मृतदेह घरीच लपवून घेतला होता. त्यांनतर पतीने दोन्ही हाताच्या नसा कापून आत्महत्येचा प्रयत्न केला आणि रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. काही दिवस उलटून गेल्यानंतर शेजाऱ्यांना दुर्गंधी आल्याने त्यांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. त्यावेळी ही घटना उघडकीस आली. याप्रकरणी वडाळा टी. टी. पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल असून आरोपी पती संजयकुमार भटेल पडीहारी (२९) याला अटक करण्यात आली आहे.

सायन येथील प्रतीक्षा नगर परिसरातील बी/162, तळमजला, रहिवाशी संघ, शास्त्री नगर या ठिकाणी आरोपी संजयकुमार आपल्या पत्नीसह राहत असे. मात्र, पत्नी त्यास दारु पिण्यास विरोध करत असल्याच्या कारणावरुन दोघांचे नोव्हेंबर २०१८ पासून भांडण होते. दरम्यान आरोपी पतीने पत्नीला वेळोवेळी अमानुषपणे मारहाण करुन क्रूर वागणूक देऊन तिचा छळ केला तसेच आजारी असताना औषधे घेत नसल्याच्या कारणावरून अमानुषपणे मारहाण करुन गंभीर दुखापत करुन जीवे ठार मारले. तसेच पत्नीचा मृतदेह घरात लपवून ठेऊन पतीने स्वतःच्या दोन्ही मनगटाच्या नसा ब्लेडच्या सहाय्याने कापून स्वतःला गंभीर दुखापत करुन आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यानंतर मृत पत्नी आणि गंभीर जखमी झालेला पती घरात अनेक दिवस असल्याने शेजाऱ्यांना संजयकुमार यांच्या घरातून दुर्गंधी आल्याने त्यांनी पहिले असते पत्नी मृत अवस्थेत तर पती जखमी अवस्थेत रक्तांच्या थारोळ्यात पडलेले आढळून आले. नंतर पोलिसांना पाचारण केले असता वडाळा टी. टी. पोलिसांनी दोघांना देखील सायन रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयात महिलेला मृत घोषित करण्यात आले तर संजयकुमारवर उपचार करण्यात आले. सध्या संजयकुमार २८ मेपर्यंत पोलीस कोठडीत असल्याची माहिती वडाळा टी. टी. पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र सांगळे यांनी लोकमतशी बोलताना दिली. 

टॅग्स :MurderखूनPoliceपोलिसArrestअटकSuicideआत्महत्या