शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

Video : मद्यधुंद तरुणीने पोलिसावर लाथ उगारली अन् पकडली, भररस्त्यात केला तमाशा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2022 19:42 IST

Drunken Women abuse Police : सानपाडा येथील प्रकार, पोलिसांसोबत अश्लील चाळ्यासह केली शिवीगाळ

नवी मुंबई : मद्यधुंद अवस्थेतील तरुणीने भरस्त्यात तमाशा केल्याचा प्रकार तीन महिन्यांनी व्हायरल व्हिडीओमुळे प्रकाशात आला आहे. ओला चालकाने भाडे नाकारल्याने या तरुणीने त्याच्या कारचा ताबा घेऊन रस्त्यात धिंगाणा घातला. शिवाय पोलीस घटनास्थळी येताच अधिकाऱ्यांना शिवीगाळ करत त्यांच्यासोबत देखील अश्लील चाळे या तरुणीने केले.शहरात आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या बॅचलर तरुण तरुणींचे प्रमाण वाढत आहे. मद्यपान, धूम्रपान करून रात्री अपरात्री वावरणे हे देशाच्या काना कोपऱ्यातून आलेल्या तरुणांच्या दृष्टीने मॉडर्न कल्चर समजले जात आहे. त्यानुसार शहरातील पब, लाउंज याठिकाणी अशा तरुणांची गर्दी पहायला मिळते. अशाच गर्दीतून मद्यधुंद होऊन आलेल्या तिघा तरुणींचे भाडे ओला चालकाने नाकारले. यावरून स्वतःवरील नियंत्रण हरवलेल्या तरुणीने ओला चालकाला धमकावून त्याच्या कारचा ताबा मिळवला. 

 

त्यानंतर या तरुणीने भरस्त्यात आरडा ओरडा करत परिसराची शांतता भंग केली. याबाबत पोलिसांना कळले असता पोलिसही त्याठिकाणी धडकले. परंतु मद्यधुंद अवस्थेतील या तरुणीने पोलीस अधिकाऱ्यांसोबत देखील अश्लील चाळे करत धक्काबुकी केली. हा प्रकार मार्च महिन्यात सानपाडा येथे पामबीच मार्गालगत घडला आहे. याप्रकरणी तिच्यावर कारवाई देखील करण्यात आली असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. तर आयुक्तालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत या प्रकरणाची अद्यापही चौकशी सुरु असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान गुरुवारी रात्रीपासून पुन्हा या प्रकरणातील तरुणीचा व्हिडीओ व्हायरल होऊ लागला आहे. त्यामुळे हा प्रकार पुन्हा प्रकाशात आला आहे.

 

टॅग्स :PoliceपोलिसNavi Mumbaiनवी मुंबई