Video: Complaint against election officials of Dombivli polling station | Video : डोंबिवलीत मतदान केंद्रातील निवडणूक अधिका-यांविरोधात तक्रार
Video : डोंबिवलीत मतदान केंद्रातील निवडणूक अधिका-यांविरोधात तक्रार

ठळक मुद्दे निवडणूक अधिकारी, कर्मचा-यांची चौकशी करावी अशी मागणी भाजपचे पश्चिम मंडळ अध्यक्ष प्रज्ञेश  प्रभुघाटे यांनी निवडणूक अधिका-यांकडे लेखी तक्रार देत केली.सकाळपासून हा प्रकार सुरू होता, भाजप कार्यकत्र्यानी त्यासंदर्भात संबंधित केंद्रावरील कर्मचा-यांना सूचित केले होते.एका वृत्तपत्रमध्ये आघाडीची जाहिरात होती, ती केंद्रामधील टेबलांवर मांडण्यात आली होती.

अनिकेत घमंडी

डोंबिवली - मतदार याद्यांमध्ये घोळ असतांनाच सर्वच राजकीय पक्ष मतदारांना सामोरे जातांना घामाघूम झाले होते. त्या संधीचा फायदा घेत पश्चिमेकडील महात्मा गांधी विद्यालयातील मतदान केंद्रामध्ये निवडणूक प्रर्कियेतील अधिकारी, कर्मचारी हे आघाडीच्या उमेदवाराला मतदान करा असा संदेश देत होते. त्यासंदर्भात टेबलावर एका वृत्तपत्रची जाहिरात असलेले वृत्तपत्र टेबला खाली आले कसे असा सवाल करत निवडणूक अधिकारी, कर्मचा-यांची चौकशी करावी अशी मागणी भाजपचे पश्चिम मंडळ अध्यक्ष प्रज्ञेश  प्रभुघाटे यांनी निवडणूक अधिका-यांकडे लेखी तक्रार देत केली.

सकाळपासून हा प्रकार सुरू होता, भाजप कार्यकत्र्यानी त्यासंदर्भात संबंधित केंद्रावरील कर्मचा-यांना सूचित केले होते. परंतू त्याचा काहीही उपयोग झाला नाही. त्यामुळे भाजप मंडळींनी त्या केंद्रावर जात पाहणी केली. त्यानुसार पाहणीत एक कर्मचारी 1 नंबरवर मतदान करा असे सर्रास सांगत होता. एका वृत्तपत्रमध्ये आघाडीची जाहिरात होती, ती केंद्रामधील टेबलांवर मांडण्यात आली होती. त्यामुळे टेबलावर टाकायला कापड मिलाले नाही का? असा सवाल प्रभुघाटे यांनी केला. त्यांनी केलेल्या प्रश्नांची उत्तरे देता न आल्याने प्रभुघाटे यांनी थेट निवडणूक अधिकारी गजेंद्र पाटोळे यांच्याकडे धाव घेत लेखी तक्रार दिली. त्या तक्रारीसोबत टेबलावर टाकण्यात आलेले पेपर देखिल जोडले होते. त्यानूसार अधिका-यांनी चौकशी करतो, माहिती घेतो असे सांगत तक्रार अर्ज घेतला. सोशल मीडियावर त्या संदर्भातचा व्हिडीओ भाजप मंडळींनी टाकल्याने या संदर्भात शहरभर चर्चा सुरु होती. 


Web Title: Video: Complaint against election officials of Dombivli polling station
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.