शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

Video : भ्रष्ट कारभाराविषयी नाराजी; महापालिका मुख्यालयाबाहेर आत्मदहनाचा प्रयत्न 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2021 15:53 IST

Attempt of self-immolation : खोट्या तक्रारदारांनाअधिकाऱ्यांची साथ 

ठळक मुद्देखोट्या तक्रारी करून पैसे लाटणाऱ्यांना पालिका अधिकारी देखील साथ देत असल्याचा आरोप करत त्यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला. 

नवी मुंबई : महापालिकेच्या भ्रष्ट कारभाराविषयी नाराजी व्यक्त करत एका व्यक्तीने पालिका मुख्यालयाबाहेर आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. या व्यक्तीला पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. खोट्या तक्रारी करून पैसे लाटणाऱ्यांना पालिका अधिकारी देखील साथ देत असल्याचा आरोप करत त्यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला. 

सीबीडी येथील पालिका मुख्यालयाबाहेर मंगळवारी दुपारी हा प्रकार घडला. घणसोली येथे राहणारे योगेश चव्हाण यांनी काही दिवसांपूर्वी कोपर खैरणे विभाग कार्यालयात ठिय्या मांडला होता. काही राजकीय व्यक्ती पालिका अधिकाऱ्यांना हाताशी धरून सर्वसामान्यांना लुटत असल्याचा त्यांचा आरोप होता. त्यामुळे खोट्या तक्रारदारांना प्रशासनाने थारा देऊ नये अशी त्यांची मागणी होती. परंतु विभाग अधिकाऱ्यांनी त्यांना प्रतिसाद दिला नव्हता. शिवाय त्यानंतर देखील एकाच व्यक्ती विरोधात अधिकाधिक तक्रार अर्ज करून त्रास देण्याचा प्रकार सुरूच होता. त्यामुळे संतप्त योगेश चव्हाण यांनी मंगळवारी पालिका मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावरच स्वतःवर पेट्रोल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी तिथे बंदोबस्तावर उपस्थित पोलीस व सुरक्षा रक्षकांनी त्यांना ताब्यात घेतले. 

कोपर खैरणे विभाग कार्यालयांतर्गत अतिक्रमणाच्या मुद्द्यावरून मोठा भ्रष्टाचार होत असल्याचा चव्हाण यांचा आरोप आहे. याबाबत त्यांनी यापूर्वी पालिका आयुक्तांसह पोलीसांना देखील निवेदन दिलेले आहेत. परंतु भ्रष्ट अधिकाऱ्यांना पाठीशी घातले जात असल्याने सर्वसामान्यांची पिळवणूक होत असल्याच्या निषेधार्थ आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे चव्हाण यांनी सांगितले. 

टॅग्स :Corruptionभ्रष्टाचारNavi Mumbaiनवी मुंबईNavi Mumbai Municipal Corporationनवी मुंबई महानगरपालिकाPoliceपोलिस