व्यंकट नंदगावे खून प्रकरण : पुंडलिक काळेला सात दिवसांची पोलीस कोठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2018 18:10 IST2018-07-17T18:09:43+5:302018-07-17T18:10:56+5:30
सासऱ्याच्या खून प्रकरणात अटक असलेल्या पुंडलिक गोविंद काळे याला आज चाकूर न्यायालयामध्ये हजर करण्यात आले. त्याला न्यायालयाने सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
_201707279.jpg)
व्यंकट नंदगावे खून प्रकरण : पुंडलिक काळेला सात दिवसांची पोलीस कोठडी
चाकूर (लातूर ) : सासऱ्याच्या खून प्रकरणात अटक असलेल्या पुंडलिक गोविंद काळे याला आज चाकूर न्यायालयामध्ये हजर करण्यात आले. त्याला न्यायालयाने सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
रविवारी रात्री शहरातील बोथी चौकात व्यंकट भिमराव नंदगावे यांचा तीक्ष्ण हत्याराने वार करून खून करण्यात आला होता. या प्रकरणी व्यंकट यांचे भाऊ विजयकुमार नंदगावे यांनी चाकूर पोलीसात तक्रार दिली होती. यात त्यांनी जावई पुंडलिक काळे याच्यावर संशय व्यक्त केला होता.
यावरून पोलिसांनी तपास करत सोमवारी नंदगावे यांच्या जावयास उदगीर येथून अटक केली. आज त्यास न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने पुढील तपासासाठी त्यास सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. पुढील तपास पोलीस निरिक्षक रामेश्वर तट, पोहेकॉ हणमंत आरदवाड हे करत आहेत.