शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

मीरारोड: वाहनांतील सायलेन्सर चोरणारी टोळी जेरबंद; चोरीचे १८ गुन्हे उघडकीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2022 19:16 IST

टोळीने आता पर्यंत १८ सायलेन्सर चोरीचे गुन्हे केल्याचे उघडकीस आले आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्क 

मीरारोड: मीरा भाईंदर-वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या मध्यवर्ती गुन्हे प्रकटीकरण शाखेने वाहनांचे सायलेन्सर चोरणाऱ्या टोळीला अटक केली असून तपासात टोळीने आता पर्यंत १८ सायलेन्सर चोरीचे गुन्हे केल्याचे उघडकीस आले आहे. 

इको चारचाकी वाहनाचे सायलेन्सर चोरीच्या गुन्हयात वाढ होत असल्याने गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त डॉ . महेश पाटील व सहायक आयुक्त अमोल मांडवे यांच्या मार्गदर्शनाखाली मध्यवर्ती गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल राख, सपोनि अमोल आंबवणे, दत्तात्रय सरक व नितीन बेंद्रे, उपनिरीक्षक कैलास सोनावणे सह चंद्रकांत पोशिरकर, मते, राणे, तावरे, यादव, केंद्रे, काळे, पाटील, वेल्हे, श्रीवास्तव, जगताप, पवार, गायकवाड यांचे एक विशेष पथक नेमण्यात आले होते. पथकाने वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरु करत गुप्तबातमीदार व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे टोळीची माहिती मिळवली . 

ती टोळी मीरारोडच्या हटकेश चौक भागात येणार असल्याची माहिती मिळाल्या नंतर पोलीस पथकाने सापळा रचून २३ जानेवारी रोजी इम्रान ईरशाद खान (३५) ; शाहरुख नसीम खान (२४) व जावेद बशीर खान (२८) सर्व रा. घाटकोपर, मुंबई यांना ताब्यात घेतले. त्यांच्या कडील पिशव्यांची तपासणी केली असता त्यामध्ये सायलेन्सरचे पार्ट व ते कापण्या करिता लागणारे साहीत्य सापडले. 

पोलिसांनी तिघांची कसून चौकशी सुरु केली असता त्या टोळीने आचोळे पोलीस ठाणे हद्दीत ४ ;  नालासोपारा पोलीस ठाणे हद्दीत २, तुळींज व विरार पोलीस ठाणे हद्दीत  प्रत्येकी १ असे ८ गुन्हे एकट्या नालासोपारा व विरार भागात केल्याचे उघडकीस आले. नवी मुंबई आयुक्तालयातील खारघर, कौपरखैरणे व रबाळे पोलीस ठाणे हद्दीत प्रत्येकी २ तर कामोठे हद्दीत ४ असे एकूण १० गुन्हे केले आहेत . ह्यात आणखी एक आरोपी सैबान ह्याचा शोध सुरु आहे. गुन्ह्यातील सायलेन्सरचे पार्ट, सायलेन्सर चोरी करण्यासाठीचे वापरत असलेले साहीत्य व गुन्हे करण्यासाठी वापरलेली कार असा ३ लाख ६६ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी