शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

वसईकरांचे आरोग्य धोक्यात; पनीर पाठोपाठ भेसळयुक्त मिठाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2019 21:23 IST

सोमवारी दुपारी पालघर पोलीस अधीक्षक गौरव सिंग यांच्या विशेष पथकातील पोलीस उपनिरीक्षक मल्हार थोरात आणि साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुरेंद्र शिवदे यांच्या पथकाने बापाने रोडवर वाकीपाडा येथे कृष्णा मंगल डेअरी व स्विट मार्ट येथे  छापा घातला.

ठळक मुद्देही मिठाई बुरशी लागलेली आणि दुर्गंधीयुक्त होती. मागील आठवड्यात पोलिसांनी कारवाई करून अडीच हजार किलो भेसळयुक्त पनीरचा साठा जप्त केला होता.

वसई - वसई विरार शहरात विविध भेसळयुक्त पदार्थ बनविण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. पालघर पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने मुंबई अहमदाबाद महामार्गावरील बापाणे येथील दोन डेअऱीवर छापा घालून तब्बल अडीचशे किलो भेसळयुक्त मिठाई जप्त केली आहे. ही मिठाई बुरशी लागलेली आणि दुर्गंधीयुक्त होती. मागील आठवड्यातच पोलिसांनी अडीच हजार किलो भेसळयुक्त पनीर जप्त केले होते. सोमवारी दुपारी पालघर पोलीस अधीक्षक गौरव सिंग यांच्या विशेष पथकातील पोलीस उपनिरीक्षक मल्हार थोरात आणि सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुरेंद्र शिवदे यांच्या पथकाने बापाने रोडवर वाकीपाडा येथे कृष्णा मंगल डेअरी व स्विट मार्ट येथे  छापा घातला. या ठिकाणी अन्न सुरक्षेच्या कुठल्याही नियमांचे पालन न करता गलिच्छ वातावरणात मिठाईचा साठा आणि मिठाई बनवली जात असल्याचे दिसून आले. या साठ्यात मिल्क केक, पेढे, बर्फी आणि लाडू  यांचा समावेश होता.. कृष्णा मंगल डेअरी येथे अंदाजे एकूण ११० किलो बुरशी व दर्गंधीयुक्त मिठाई तसेच अंदाजे १५० किलो पुर्नवापर करून बनविलेली बनावट मिठाई अशी एकूण २५० किलो बनावट मिलावटी भेसळयुक्त मिठाई मिळून आली. मागील आठवड्यात पोलिसांनी कारवाई करून अडीच हजार किलो भेसळयुक्त पनीरचा साठा जप्त केला होता.

टॅग्स :Vasai Virarवसई विरारPoliceपोलिस