शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

२७ वर्षीय तरुणाकडून वास्को पोलीसांनी रंगेहात पकडला १ कीलो २०० ग्राम गांजा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2021 22:34 IST

पोलीसांना मिळाल्यानंतर त्यांनी सापळा रचून त्याला केली गजाआड

वास्को: दक्षिण गोव्यात असलेल्या वास्को शहरातील थोड्याच अंतरावरील देऊसोवाडो, चिखली येथे एक तरुण गांजा अमली पदार्थ विकण्यासाठी येणार असल्याची पूर्व माहीती वास्को पोलीसांना मिळताच त्यांनी मंगळवारी (दि.६) संध्याकाळी येथे सापळा रचून प्रबीर प्रोवत बेपारी या तरुणाला १ कीलो २०० ग्राम गांजासहीत रंगेहात पकडला. प्रबीरकडून जप्त केलेल्या गांजाची कींमत १ लाख २० हजार रुपयांच्या आसपास असून याप्रकरणात त्याच्याबरोबर अन्य एका व्यक्तीचा समावेश असल्याची माहीती पोलीसांना प्राप्त झाल्याने त्या व्यक्तीशी पोचण्यासाठी पोलीस उचित पावले उचलत असल्याची माहीती सूत्रांनी दिली.

वास्को पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहीतीनुसार मंगळवारी संध्याकाळी ४.५० ते ७ यादरम्यान सापळा रचण्याबरोबरच धाड मारून प्रबीर याला गांजा अमली पदार्थासहीत रंगेहात पकडला. एक तरुण चिखली भागात मोठ्या प्रमाणात गांजा घेऊन एका व्यक्तीला विकण्यासाठी येणार असल्याची माहीती पोलीसांना मिळताच त्याला गजाआड करण्यासाठी पोलीसांनी तेथे सापळा रचला. ही कारवाई करण्यावेळी येथे मुरगावच्या मामलेदारांनी उपस्थिती लावली होती अशी माहीती पोलीसांकडून प्राप्त झाली.

सापळा रचल्यानंतर तो तरुण गांजा घेऊन आल्याची माहीती प्राप्त होताच पोलीस उपनिरीक्षक प्रमीला फर्नांडीस व इतर पोलीस पथकाने तेथे धाड मारून त्याला तरुणाला ताब्यात घेतला. नंतर त्याची तपासणी केली असता त्याच्याकडून १ कीलो २०० ग्राम गांजा अमली पदार्थ सापडला.  गांजासहीत रंगेहात पकडलेल्या त्या तरुणाशी पोलीसांनी अधिक चौकशी केली असता त्याचे नाव प्रबीर बेपारी (वय २७) असे असल्याचे स्पष्ट होऊन तो झुअरीनगर भागात राहत असल्याचे उघड झाले. गांजा प्रकरणात पकडलेला प्रबीर हा सूत्रार म्हणून काम करत असून तो मूळ पच्छीम बंगाल येथील रहीवाशी असल्याचे चौकशीवेळी स्पष्ट झाले.

पोलीस उपनिरीक्षक प्रमीला फर्नांडीस व इतर पोलीसांना धाड मारून प्रबीर याला गांजासहीत रंगेहात पकडल्यानंतर उपनिरीक्षक रितेश तारी यांनी याप्रकरणात गुन्हा नोंद करून त्याला अटक केली. या गांजा प्रकरणात अन्य एका इसमाचा हात असण्याची माहीती पोलीसांना चौकशीवेळी प्राप्त झालेली असून पोलीस त्या मार्गानेही तपास करित आहेत.

टॅग्स :goaगोवाPoliceपोलिस