शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

वसई विरार गुटख्याचा अड्डा, पुन्हा ८० लाखांचा गुटखा जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2018 19:10 IST

आज स्थानिक गुन्हे शाखेच्या वसई विभागाने महामार्गावरील खानिवडे येथे एका ट्रकवर कारवाई करून ८० लाख रुपयांचा गुटखा जप्त केला. गेल्या काही दिवसातली ही दुसरी मोठी कारवाई आहे. 

वसई - वसई विरार शहरात बंदी असलेल्या गुटख्याची राजरोसपणे विक्री होत असून गुजरातमधून छुप्या मार्गाने गुटखा शहरात आणला जात आहे. आज स्थानिक गुन्हे शाखेच्या वसई विभागाने महामार्गावरील खानिवडे येथे एका ट्रकवर कारवाई करून ८० लाख रुपयांचा गुटखा जप्त केला. गेल्या काही दिवसातली ही दुसरी मोठी कारवाई आहे. 

राज्यात गुटख्यावर बंदी असूनही वसई विरार शहरात मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर गुटख्याची विक्री केली जात आहे. गुजरातमधून एक ट्रक गुटखा घेऊन येणार असल्याची माहिती वसईच्या स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. पोलिसांच्या पथकाने मंगळवारी रात्रीपासून खानिवडे टोल नाक्यावर सापळा लावला होता. बुधवारी हा ट्रक येतात पोलिसांनी ट्रक अडवून तपासणी केली असता त्याच्यात ६० लाखांचा गुटखा आढळून आला. विविध कंपन्यांचा गुटखा ट्रकमध्ये लपवून ठेवण्यात आला होता. पोलिसांनी ट्रकचालकाला अटक केली आहे. हा गुटखा मीरारोडला नेत असल्याची माहिती ट्रकचालकाने पोलिसांना दिली. वसई गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र वनकोटी, पोलीस उपनिरीक्षक हितेंद्र विचारे यांच्या पथकाने ही कारवाई केली. काही दिवसांपूर्वी स्थानिक गुन्हे शाखेने महामार्गावर दोन ट्रक जप्त करून एक कोटी रुपयांचा गुटखा जप्त केला होता. पुढील कारवाईसाठी जप्त केलेला गुटखा अन्न व औषध प्रशासनाकडे सुपूर्द करण्यात आला आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीGujaratगुजरात