शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

'पत्नीला मारल्यावर दारुच्या धंद्यात भरभराटी येईल', मांत्रिकाच्या सांगण्यावरून कुटुंबाला संपवलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2024 18:01 IST

एका दारु व्यापाऱ्याने मांत्रिकाच्या सांगण्यावरुन पत्नी आणि तीन मुलांची हत्या केल्याचे समोर आले आहे.

Varanasi Murder:उत्तर प्रदेशातील वाराणसीमधून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. मांत्रिकाच्या सांगण्यावरुन एका मद्य व्यापाऱ्याने पत्नी आणि तीन मुलांची हत्या केली अन् काही वेळानंतर स्वतःवरही गोळी झाडून आयुष्य संपवले. राजेंद्र गुप्ता, असे या व्यक्तीचे नाव असून, एका कुटुंबातील चौघांच्या हत्येने परिसरात खळबळ उडाली आहे. या संपूर्ण घटनेने पोलीसही आश्चर्यचकित झाले आहेत. 

मांत्रिकाचा सल्ला ऐकलापोलिसांच्या तपासात एका मांत्रिकाची एंट्री झाली आहे. राजेंद्र गुप्ताने मांत्रिकाच्या सांगण्यावरुनच हा जघन्य गुन्हा केल्याचे उघड झाले आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दारू व्यावसायिक राजेंद्र गुप्ता याच्याकडे पैशांची कमतरता नव्हती. एका प्रॉपर्टीच्या भाड्यातून त्याला दरमहा 5 लाखांहून अधिक रक्कम मिळत होती. पण, गेल्या वर्ष भरापासून त्याचा अवैध दारुचा धंदा चांगला चालत नव्हता. यामुळेच तो अनेक दिवसांपासून चिंतेत होता. या कारणामुळे तो जवळपास वर्षभर आपल्या घरीही आला नव्हता. हा दारुचा व्यवसाय सुधारण्यासाठी त्याने एका मांत्रिकाशी संपर्क साधला. 

पत्नी अन् तीन मुलांना मारलेमांत्रिकाने व्यवसायात पत्नीमुळे अडथळा येत असून, जोपर्यंत पत्नी जीवंत आहे, तोपर्यंत व्यवसाय वाढू शकणार नसल्याचे सांगितले. त्याच्या या सल्ल्याने दारू व्यावसायिक राजेंद्र गुप्ता ठार वेडा झाला. यानंतर तो जवळपास वर्षभरानंतर दिवाळीच्या दिवशी आपल्या घरी परतला आणि पत्नी, मुलांसोबत दिवाळी साजरी केली. वर्षभरानंतर तो घरी परतल्याने कुटुंबीयही खूप आनंदी होते. पण, मंगळवारी सकाळी संधी पाहून राजेंद्र गुप्ता याने 45 वर्षीय पत्नी नीतू गुप्ता, 25 वर्षीय मुलगा नमन, 17 वर्षीय मुलगी गौरी आणि 15 वर्षीय लहान मुलगा छोटू, यांनाही मारले. 

अवैध संबंधांचा संशयपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेत अनैतिक संबंधाचा अँगलही समोर आला आहे. तपासादरम्यान राजेंद्र गुप्ता याची पहिली पत्नी 90च्या दशकात त्याला सोडून गेल्याचे समोर आले आहे. यानंतर राजेंद्र गुप्ताने वडील, भाऊ, मेव्हणा आणि सिक्युरिटी गार्डची हत्या केली. या प्रकरणात तो तुरुंगात गेला होता. तुरुंगातून बाहेर येताच त्याने दुसरे लग्न केले आणि या लग्नातून त्याला दोन मुले आणि एक मुलगी झाली. दरम्यान, राजेंद्र गुप्ता एका महिलेच्या संपर्कात असल्याचे समोर आले आहे. या महिलेशी त्याला लग्न करायचे होते, पण पत्नी संबंधात अडथळा ठरत होती. 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशCrime Newsगुन्हेगारी