शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

आम्ही भाई आहोत, म्हणत गाड्यांची तोडफोड; दोन जणांना मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2022 21:47 IST

Crime News : याप्रकरणी संदीप विनायक बागुल (वय, ४८, सुदंरबाग कॉलनी, दापोडी) यांनी फिर्याद दिली आहे.

पिंपरी : दहशत माजविण्याच्या इरद्याने आठ जणांच्या टोळक्याने सुंदरबाग कॉलनी, दापोडी येथे दोन कार, टेम्पो, दुचाकीच्या काचा दगडाने व पेव्हिंग ब्लॉकने फोडल्या. तसेच तेथे आलेल्या दोन जणांना मारहाण करत “आम्ही येथील भाई आहोत, पोलिसांत तक्रार कराल तर याद राखा”, अशी धमकी दिली. शनिवारी रात्री ११च्या सुमारास हा प्रकार घडला. या तथाकथित भाईंवर पोलिसांनी कारवाई करत चार जणांना अटक केली आहे. याप्रकरणी संदीप विनायक बागुल (वय, ४८, सुदंरबाग कॉलनी, दापोडी) यांनी फिर्याद दिली आहे. अटक केलेल्या आरोपींची नावे शेखर सुदाम भालेराव (वय २०, रा. दापोडी) अंकित सुदाम भालेराव (वय २१, दापोडी), सुमित भीम सूर्यवंशी (वय १९, रा. फुलेनगर, दापोडी), रोनित मोरे (वय १९, दापोडी) अशी आहेत. तर, रोहित सरोदे (वय २०, दापोडी), आदित्य कांबळे (वय २१), अजय जाधव (वय २०) रोहित मनतोडे हे आरोपी फरार आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी दहशत माजविण्यासाठी सुंदरबाग कॉलनीतील सार्वजनिक रोडवर मोठमोठ्या आवाजात आरडाओरडा करत दोन कार, एक टेम्पो आणि एका दुचाकीची दगड आणि पेव्हिंग ब्लॉकद्वारे फोडल्या. यावेळी फिर्यादी आणि त्याचा भाऊ पराग बागूल यांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला असता आरोपी शेखर भालेराव, अंकित भालेराव व सुमित सूर्यवंशी यांनी फिर्यादी आणि पराग बागुल यांना मारहाण करत त्यांच्या जवळील १,२०० रुपये काढून घेत “आम्ही इथले भाई आहोत. तुम्ही आमचे काय वाकडे करणार? तुम्ही जर पोलिसांत तक्रार केली तर तुम्हाला सोडणारी नाही.” अशी धमकी दिली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPoliceपोलिसArrestअटक