वैजापुरात पूर्व वैमनस्यातून दोन गट भिडले; मारहाणीत वृद्धाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2018 16:30 IST2018-08-08T16:27:40+5:302018-08-08T16:30:41+5:30
वैजापूर तालुक्यातील वाघाला येथे मंगळवारी संध्याकाळी पूर्व वैमनस्यातून दोन गट आपसात भिडले.

वैजापुरात पूर्व वैमनस्यातून दोन गट भिडले; मारहाणीत वृद्धाचा मृत्यू
औरंगाबाद : वैजापूर तालुक्यातील वाघाला येथे मंगळवारी संध्याकाळी पूर्व वैमनस्यातून दोन गट आपसात भिडले. यावेळी झालेल्या मारहाणीत एका ६५ वर्षीय वृद्धचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. कारभारी बालाजी पठारे असे मृताचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, मंगळवारी सायंकाळी वाघाला येथील दोन गट पूर्व वैमनस्यातून आपसात भिडले. यावेळी ६५ वर्षीय कारभारी पठारे हे गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, सकाळी त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी शिऊर पोलीस ठाण्यात १४ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी चार आरोपींना ताब्यात घेतल्याची माहिती स.पो.नि. महेश आंधळे यांनी दिली आहे.