शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
2
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
3
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
4
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
5
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
6
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
7
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
8
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
9
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
10
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
11
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
12
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
13
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
14
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
15
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
16
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
17
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
18
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
19
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
20
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल

पती आवडत नसल्यानं प्रियकर, मित्राच्या मदतीनं घडवली हत्या; महिन्याभरापूर्वीच सुरू झालेला संसार संपवला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2021 10:57 IST

जुलैमध्ये विवाह, ऑगस्टमध्ये हत्या; प्रियकर आणि मित्राच्या मदतीनं पत्नीनं पतीला संपवलं

लखनऊ: लखनऊच्या मडियांवमध्ये पत्नीनं तिच्या प्रियकर आणि मित्राच्या मदतीनं स्वत:च्या पतीची हत्या घडवून आणली आहे. पत्नीनंच या हत्येचा कट रचला होता. विशेष म्हणजे अवघ्या महिन्याभरापूर्वीच दोघांचा विवाह झाला होता. मात्र पत्नीला पती आवडत नसल्यानं तिनं त्याच्या हत्येचं कारस्थान रचलं. पोलिसांनी या प्रकरणी तिघांना अटक केली आहे. हत्या प्रकरणात वापरण्यात आलेलं पिस्तुल आणि एसयूव्ही कारदेखील पोलिसांनी ताब्यात घेतली आहे.

नवविवाहिता, तिचा प्रियकर आणि मित्र हे तिघेही प्राथमिक विद्यालयात सहाय्यक शिक्षक आहेत. शनिवारी पोलिसांनी तिन्ही आरोपींना न्यायालयात हजर केलं. न्यायालयानं त्यांची रवानगी पोलीस कोठडीत केली. हरदोई राहणारा आशुतोष सिंह (२७ वर्षे) मडियावच्या ग्लोबल डायग्नॉस्टिक सेंटरमध्ये पीआरओ होता. तो मडियावमधल्या इंद्रपुरम सोसायटीत भाऊ राजेश, अनुपम आणि पुतण्या विकास सिंहसोबत वास्तव्यास होता.

२३ ऑगस्टला आशुतोष रात्री कामावरून परतला. मात्र कोणाचा तरी फोन आल्यानं तो घरातून पुन्हा निघाला. २४ ऑगस्टला मडियावमधल्या आयआयएम रोडजवळ आशुतोषचा मृतदेह आढळून आला. गोळी झाडून आशुतोषची हत्या झाल्याची बाब शवविच्छेदन अहवालातून समोर आली. आशुतोषच्या भावानं दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी तपास सुरू केला.

पोलिसांनी आशुतोषच्या पत्नीचा सीडीआर तपासला. त्यानंतर पत्नी प्रीती, तिचा प्रियकर हेमेंद्र प्रताप यादव आणि मित्र सुनील सिंह यांना अटक करण्यात आली. हेमेंद्रकडे हत्येत वापरण्यात आलेलं पिस्तुल सापडलं. प्रीती संडिला येथील प्राथमिक शाळेत शिक्षिका आहे. तर हेमेंद्र, सुनील इटावातल्या प्राथमिक शाळेत शिक्षक आहेत. हेमेंद्र आणि प्रीती २०१५ ते २०२१ दरम्यान औरास येथील प्राथमिक शाळेत कार्यरत होता. तेव्हा दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. फेब्रुवारी २०२१ मध्ये प्रीतीची संडिला येथे बदली झाली. जुलै २०२१ मध्ये प्रीतीचा विवाह कुटुंबीयांनी आशुतोषसोबत केला. 

प्रीती आणि हेमेंद्र काही दिवस एकमेकांसोबत बोलत नव्हते. प्रीतीला आशुतोष आवडत नव्हता. तिनं ही बाब सुनीलला सांगितली. सुनीलनं ही गोष्ट हेमेंद्रच्या कानावर घातली. त्यानंतर प्रीतीनं हेमेंद्रकडे बदलीचा आग्रह धरला. मात्र बदली होऊ शकली नाही. त्यामुळे प्रीतीनं हेमेंद्र आणि सुनीलच्या मदतीनं पतीच्या हत्येचा कट रचला.