शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

घर मालकासोबत लुडो खेळताना स्वतःलाही डावावर लावलं अन् हरली, पतीच्या दाव्यावर पत्नीचा यू-टर्न; अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2022 12:05 IST

हे संपूर्ण प्रकरण प्रतापगड जिल्ह्यातील देवकाली येथील आहे. येथे पती उमेश आणि त्याची पत्नी रेणू एका भाड्याच्या घरात राहत होते. येथे उमेशने पत्नी रेणूला लुडो खेळाचे व्यसन असल्याचा आरोप करत, पोलिसात तक्रार दाखल केली आहे...

उत्तर प्रदेशातील प्रतापगडमधून पती आणि पत्नीच्या वादाचे एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. महत्वाचे म्हणजे, या वादाचे कारण ठरला आहे 'लुडो गेम'. यासंदर्भात पतीने आरोप केला आहे, की त्याची पत्नी घर मालकासोबत लुडो आणि पत्ते खेळण्याच्या नादात एवढी गुंग झाली, की तिने पैशांसोबतच स्वतःलाही डावावर लावले आणि हरली. याच बरोबर, आपण जयपूरमध्ये दिवस-रात्र मेहनत करत होतो आणि सर्व कमाई पत्नीला पाठवत होतो. याचा तिच्याकडे कधीही हिशोब मागितला नाही, यामुळे मला काहीच कळले नाही, असेही संबंधित महिलेच्या पतीने म्हटले आहे.

मात्र, आता हे संपूर्ण प्रकरण उलटे झाले आहे. आता पत्नीनेच पतीला जुगाराचे व्यसन असल्याचा आरोप केला आहे. तसेच आपल्याला असे कुठलेही व्यसन नाही, असेही तिने म्हटले आहे. 

लुडो खेळाचे व्यसन असल्याचा आरोप - हे संपूर्ण प्रकरण प्रतापगड जिल्ह्यातील देवकाली येथील आहे. येथे पती उमेश आणि त्याची पत्नी रेणू एका भाड्याच्या घरात राहत होते. येथे उमेशने पत्नी रेणूला लुडो खेळाचे व्यसन असल्याचा आरोप करत, पोलिसात तक्रार दाखल केली आहे. यात आपली पत्नी लुडो खेळताना हरल्यानंतर, घर मालकाकडे राहू लागली आहे. महिलेच्या पतीच्या तक्रारीनुसार, तो सहा महिन्यांपूर्वी कामानिमित्त जयपूरला गेला होता. यादरम्यान तो घरी पैसे पाठवत राहिला, तर लुडोचे व्यसन असलेल्या पत्नीने सर्व पैसे जुगारावर खर्च केले.

लूडोमध्ये स्वतःलाही डावात लावले - रेणूच्या पतीने दावा केला आहे की, लुडो खेळताना पैसे संपल्यानंतर आपल्या पत्नीने स्वतःला डावात लावले आणि हरली. पतीच्या म्हणण्यानुसार, महिला आता घरमालकाकडे राहते. एवढेच नाही, तर त्याने तिला सोडविण्याचाही प्रयत्न केला. पण ती ऐकायला तयार नाही.

माझ्या पतीलाच जुगाराचं व्यवसन -यावर महिलेनेही, आपल्याला जुगाराचे व्यसन नसून आपल्या पतीलाच जुगाराचे व्यसन आहे, असादावा केला आहे. यावर आता, पोलीस तक्रारदार पतीचा शोध घेत आहेत. संबंधित महिलेने पोलिसांना सांगितले, की “माझ्या पतीलाच जुगाराचे व्यसन आहे. मला असे कुठलेही व्यसन नाही. मी व्यवसायाने घर कामगार आहे आणि घर चालविण्यासाठी मेहनत करते. 

टॅग्स :husband and wifeपती- जोडीदारUttar Pradeshउत्तर प्रदेशPoliceपोलिस