शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

कोरोनामुळं नवऱ्याचा मृत्यू, एकट्या वहिनीवर दिरानं केला बलात्कार; भररस्त्यात पळवून पळवून मारलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2021 10:56 IST

कानपूरच्या विनायक पूरमध्ये भररस्त्यात मारहाण केलेल्या या पीडित महिलेसोबत दिरानं बलात्कार केला होता.

ठळक मुद्देकाही दिवसांपूर्वीच पीडित महिलेच्या पतीचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. पीडितेने दिराच्या करकुतीबाबत पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार नोंदवली. त्याचा राग धरलाभावाच्या मृत्यूनंतर दिराने वहिनीवर डोळा ठेवला. एकट्या वहिनीला गाठत त्याने तिच्यावर अतिप्रसंग केला.

उत्तर प्रदेशच्या कानपूरमध्ये कोरोनामुळे पतीचा मृत्यू झाल्यानंतर विधवा पत्नीसोबत धक्कादायक घटना घडली आहे. पीडितेसोबत दिराने बलात्कार केला. त्यानंतर पीडित महिलेने याबाबत पोलीस ठाण्यात दाद मागितली. पोलिसांनी तक्रार नोंदवली त्यानंतर पीडित महिला घरी परतल्यानंतर दिरानं त्यांच्या बहिणींसोबत मिळून वहिनीला सगळ्यांसमोर ओढत भररस्त्यात मारहाण केली. या मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

कानपूरच्या विनायक पूरमध्ये भररस्त्यात मारहाण केलेल्या या पीडित महिलेसोबत दिरानं बलात्कार केला होता. काही दिवसांपूर्वीच पीडित महिलेच्या पतीचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. पीडितेने दिराच्या करकुतीबाबत पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार नोंदवली. त्याचा राग धरत दिराने जेव्हा वहिनी पोलीस स्टेशनमधून माघारी घरी परतली तेव्हा दोन बहिणींसोबत मिळून तिला बेदम मारहाण केली.

माहितीनुसार, पीडित महिलेच्या नवऱ्याचा कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत २६ मे रोजी मृत्यू झाला होता. भावाच्या मृत्यूनंतर दिराने वहिनीवर डोळा ठेवला. एकट्या वहिनीला गाठत त्याने तिच्यावर अतिप्रसंग केला. त्यानंतर पीडित महिलेने तात्काळ पोलीस स्टेशनला धाव घेतली. पोलिसांनी संबंधित महिलेची तक्रार नोंदवून घेतली. मात्र ज्यावेळी महिला तक्रार देऊन घरी परतली तेव्हा घरात दिर आणि त्यांच्या बहिणींनी तिच्यावर हल्ला केला. पीडित महिलेला ८ वर्षाचा मुलगा आहे. दिरानं त्याच्या बहिणीसोबत एकत्र येत वहिनी आणि तिच्या मुलालाही मारहाण केल्याचा आरोप आहे.

सध्या या प्रकरणी स्थानिक पोलिसांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह निर्माण करत आहे. पीडित महिला जेव्हा FIR नोंद करण्यासाठी पोलीस ठाण्यात पोहचली तेव्हा पोलीस तिच्यावर रिपोर्ट नोंदवण्याऐवजी तडजोड करण्याची भाषा करत होते. पीडित महिलेवर पोलिसांनी दबावही टाकण्याचा प्रयत्न केला. अखेर हे प्रकरण डीसीपी संजीव त्यागी यांच्याकडे पोहचले तेव्हा तातडीने FIR नोंदवण्यात आली. परंतु तक्रार नोंदवल्यानंतर पीडित महिलेसोबत मारहाणीची घटना घडली. पोलिसांनी आरोपी दिर आणि त्याच्या बहिणींवर गुन्हा दाखल केला आहे.

पीडित महिलेचा आरोप आहे की, माझ्या नवऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यानंतर दिराने माझ्यावर बलात्कार केला. जेव्हा मी FIR दाखल करण्याची भाषा वापरली तेव्हा मला लग्नाचं आमिष दाखवलं. त्यानंतर मला घराच्या बाहेर काढण्याचा प्रयत्न केला असता मी पोलीस ठाण्यात तक्रार केली. डीसीपींच्या आदेशाने स्थानिक पोलिसांनी तक्रार नोंदवली. पण त्यानंतर मी जेव्हा घरी पोहचले तेव्हा घराच्या बाहेर भररस्त्यात मला बेदम मारलं असं तिने सांगितले. तर दिरानं बलात्कार केल्याची एका महिलेने तक्रार दिली. त्यानंतर घरच्यांनी तिला मारहाण केली. मारहाणीचाही गुन्हा नोंदवला आहे. प्रकरणाचा तपास सुरू असून दोषींवर योग्य कारवाई केली जाईल अशी माहिती डीसीपी संजीव त्यागी यांनी दिली.

टॅग्स :PoliceपोलिसUttar Pradeshउत्तर प्रदेश