आग्रा - उत्तर प्रदेश बार कौन्सिलच्या अध्यक्षा दरवेश यादव यांची आग्रा येथे कोर्टाच्या परिसरातच गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. दरवेश यादव यांच्यावर गोळी झाडणारी व्यक्तीसुद्धा पेशाने वकील असून, त्यानेही स्वत:वर गोळ्या झाडून घेतल्या आहेत. दरम्यान, आरोपीला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ३८ वर्षीय दरवेश यादव यांची दोन दिवसांपूर्वीच उत्तर प्रदेश बार कौन्सिलच्या अध्यक्षपदी निवड झाली होती. दरम्यान, आज आग्रा येथील दिवाणी कचेरीमध्ये त्यांचा स्वागत समारंभ आयोजित केला गेला होता. या कार्यक्रमादरम्यान आरोपी वकिलाने त्यांच्यावर गोळीबार केला. दरम्यान, या वकिलाने स्वत:वरही गोळी झाडून घेतली आहे. त्याची ओळख मनीष शर्मा अशी आहे.
उत्तर प्रदेश बार कौन्सिल अध्यक्षाची कोर्ट परिसरात गोळ्या झाडून हत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2019 20:12 IST