शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तानी तरुणीशी फोनवर गप्पा... लष्कराची माहिती दिली आयएसआयला, एकाला अटक!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2023 16:31 IST

लष्कराशी संबंधित महत्त्वाची माहिती पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयला व्हॉट्सअॅप आणि फेसबुकच्या माध्यमातून शेअर केली.

उत्तर प्रदेशच्या दहशतवादविरोधी पथकाने भारतीय लष्कराची हेरगिरी करणाऱ्या एका व्यक्तीला अटक केली आहे. उत्तर प्रदेशातील कासगंज येथील पटियाली येथून ही अटक करण्यात आली आहे. शैलेश कुमार उर्फ ​​शैलेंद्र सिंह चौहान असे आरोपीचे नाव आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, शैलेशने लष्कराशी संबंधित महत्त्वाची माहिती पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयला व्हॉट्सअॅप आणि फेसबुकच्या माध्यमातून शेअर केली. याप्रकरणी उत्तर प्रदेश एटीएसचे अधिकारी त्याची चौकशी करत आहेत.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शैलेशने जवळपास नऊ महिने अरुणाचल प्रदेशमध्ये भारतीय लष्करात अस्थायी मजूर म्हणून काम केले होते. यावेळी त्याने भारतीय लष्कराशी संबंधित अनेक महत्त्वाची माहिती गोळा केली. शैलेश सध्या भारतीय लष्करात कोणत्याही पदावर कार्यरत नाही. मात्र, जेव्हा त्याला कोणीही त्याच्या नोकरीबद्दल विचारत होते, तेव्हा तो आपण भारतीय सैन्यात काम करत असल्याचे सांगत होता.

ISI हँडलरच्या संपर्कातशैलेशने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शैलेश चौहान नावाने एक प्रोफाईल तयार केले होते. ज्याच्या प्रोफाईल फोटोमध्ये त्याने भारतीय सैन्याच्या गणवेशातील फोटो टाकला होता. यातून शैलेश हा प्रीती नावाच्या आयएसआय हँडलरच्या संपर्कात होता. याशिवाय, तो फेसबुकच्या माध्यमातून हरलीन कौर नावाच्या आयडीच्या संपर्कात होता, त्यांच्याशी तो मेसेंजरवर बोलत होता.

लष्कराशी संबंधित महत्त्वाची माहिती पाठवलीशैलेश आयएसआय हँडलर प्रीतीशी व्हॉट्सअॅप कॉलच्या माध्यमातून संपर्कात होता. शैलेशने प्रीतीला लष्करातील शिपाई म्हणून ओळखही दिली होती. सुरुवातीला शैलेश आणि प्रीती यांच्यात जिव्हाळ्याची चर्चा झाली. नंतर प्रितीने शैलेशला सांगितले की, ती ISI साठी काम करते आणि जर शैलेशने सहकार्य केले तर त्या बदल्यात ती त्याला चांगली रक्कम देईल. शैलेशने लष्कराशी संबंधित महत्त्वाच्या आस्थापनांचे ठिकाण आणि लष्कराच्या वाहनांच्या हालचालीचे फोटो प्रीती नावाच्या हँडलरला पाठवले.

एटीएस अधिकाऱ्यांकडून चौकशी सुरुशैलेशने प्रीतीला पाठवलेले फोटोही हरलीन कौर नावाच्या हँडलरला पाठवले होते. त्याबदल्यात शैलेशला एप्रिलमध्ये फोन पेवर दोन हजार रुपये मिळाले. यानंतर प्रीतीला लष्कराशी संबंधित महत्त्वाची माहिती अनेक वेळा पाठवली, त्या बदल्यात त्याला प्रत्येक वेळी पैसे मिळाले. हरलीन कौर आणि प्रीती या आयएसआय हँडलर असल्याचे समोर आले आहे. सध्या उत्तर प्रदेश एटीएसचे अधिकारी शैलेशची चौकशी करत आहेत. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीUttar Pradeshउत्तर प्रदेश