शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

आई-वडिलांच्या मृत्यूनंतर बहिणीने घराबाहेर काढले, 6 नराधमांनी केला सामूहिक अत्याचार…

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2024 13:54 IST

कोलकात्यानंतर डेहराडूनमध्ये सामूहिक अत्याचाराची घटना. बसचालक आणि कंडक्टर अटकेत.

Crime News : कोलकाता येथील महिला डॉक्टरवर झालेल्या बलात्कार आणि हत्येच्या घटनेमुळे देशभरात संतापाचे वातावरण आहे. दरम्यान, कोलकातासारखीच घटना उत्तराखंडमधील उधमसिंह नगर जिल्ह्यातील एका हॉस्पिटलच्या नर्ससोबत घडली. नर्सवर बलात्कार करुन तिचा खून करण्यात आला. त्या घटनेच्या दोन दिवसानंतर आता राजधानी डेहराडूनमध्ये एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्काराची घटना समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, डेहराडूनच्या बसस्थानकात बसचालक आणि त्याच्या साथीदारांनी बसमध्येच अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार केला. मुलीची तब्येत बिघडल्यानंतर आरोपींनी तिला बसस्थानकाबाहेर सोडून पळ काढला. गजबजलेल्या परिसरात घडलेल्या या घटनेने पोलिसांच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. घटनेनंतर मुलीची मानसिक स्थिती ठीक नसल्याचे सांगण्यात येत आहे. 

पंजाबला सोडते सांगून आणले...आरोपी बस चालकाला 12 ऑगस्ट रोजी पीडित अल्पवयीन मुलगी दिल्ली बसस्थानकात सापडली होती. तिला पंजाबला जायचे होते. ड्रायव्हर आणि कंडक्टरने तिला पंजाबला नेण्याचे आश्वासन देऊन डेहराडूनला आणले. तिथे तिच्यावर पाच नराधमांनी सामूहिक बलात्कार केला आणि बसस्थानकाच्या गेटबाहेस सोडून पळ काढला. बसस्थानकावरील सुरक्षा कर्मचाऱ्यांनी मुलगी जखमी अवस्थेत आढळली आणि त्यांनी याची माहिती चाइल्ड हेल्पलाइनला दिली. 

बहिणीने घरातून बाहेर काढले...पोलिसांनी बस स्थानकावरील सर्व सीसीटीव्ही स्कॅन करुन आरोपींची ओळख पटवली आणि त्यांना ताब्यात घेतले. ज्या बसमध्ये मुलीवर सामूहिक बलात्कार झाला होता, ती बसही पोलिसांनी जप्त केली आहे. दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, पीडितेच्या आई-वडीलांचे निधन झाले असून, ती आपल्या विवाहित बहिणीसोबत राहायची. 11 ऑगस्ट रोजी तिच्या बहीणीने तिला घराबाहेर काढल्यानंतर ती दिल्लीला पोहोचली. सध्या पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

टॅग्स :Uttarakhandउत्तराखंडCrime Newsगुन्हेगारी