शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा हिटमॅन 'जगात भारी'! वनडेमध्ये रोहित शर्मा अव्वल, गिलला मागे टाकत रचला विश्वविक्रम
2
जो तो एआयच्या मागे लागलाय...! इंटेलच्या CEO नी यासाठी राजीनामा दिला; आता ₹९१५ कोटी लावून...
3
भारत-अमेरिका टॅरिफ वॉर थांबणार, US सोबत खास डील होणार? ट्रम्प यांचे मोठे संकेत
4
सरकार पुन्हा विकणार LIC चे शेअर्स! केव्हा आणि कसं? जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
5
"बंगल्यात झालेल्या चोरीतून सीडी, पेनड्राईव्ह, कागदपत्रे लांबवली", एकनाथ खडसेंचा मोठा गौप्यस्फोट
6
भाभा अणुसंशोधन केंद्रात हेरगिरीचा डाव, शास्त्रज्ञ बनून फिरत होते आदिल आणि अख्तर, असं फुटलं बिंग 
7
अदानी ग्रुपचे शेअर्स पुन्हा रॉकेट! 'या' स्टॉकमध्ये १३% ची छप्परफाड वाढ; नेमकं काय घडलं?
8
"संजय राऊत सर्वात मोठा XXX, ते त्याच लायकीचे..."; शिंदेसेनेचे नेते संजय निरुपमांचं विधान
9
बच्चू कडूंनी चर्चेला यावं! लोकांना, रुग्णांना त्रास होईल असं काही करू नये - देवेंद्र फडणवीस
10
Video : दक्षिण कोरियात पोहोचले डोनाल्ड ट्रम्प; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे केले तोंडभरून कौतुक! म्हणाले...
11
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची राफेलमधून सफर; २० मिनिटे पाहिली, भारताच्या नव्या योद्ध्याची ताकद...
12
राम मंदिरासाठी भक्तांनी दिले तब्बल ३ हजार कोटींचे दान, १५०० कोटी खर्च; बांधकाम पूर्णत्वाकडे!
13
तुम्हाला किती रिटर्न मिळेल माहीत नाही, परंतु पीयूष बन्सल आणि त्यांच्या बहिणीला मिळणार कोट्यवधी रुपये
14
गुड मॉर्निंग! उठल्यानंतर फॉलो करा २०-२०-२० रूल; दिवसभर राहाल पॉझिटिव्ह अन् एनर्जेटिक
15
IND vs AUS 1st T20I : टॉस वेळी मार्शचा खास विक्रम! टीम इंडियातील युवा ऑलराउंडर ३ सामन्यातून 'आउट'
16
जमात-उल-मोमिनत... महिलांना हाताशी धरून मसूद अझहरची नवी खेळी; भारताविरोधात पुन्हा रचला कट
17
निवृत्तीनंतर तुमच्या कुटुंबालाही मिळेल पेन्शनचा आधार; जाणून घ्या 'फॅमिली पेन्शन'चे महत्त्वाचे नियम
18
स्वच्छतेतून समृद्धीकडे! मोदी सरकारने कमालच केली; ३ आठवड्यात कचऱ्यातून कमावले तब्बल ३८७ कोटी
19
जेवण बनवता येत नाही, काही शिकवले नाही का? वरळीतील विवाहितेला छळ असह्य, सासरच्यांविरोधात दिली तक्रार
20
कमी भाड्याचं आमिष दाखवून महिलांना टॅक्सीत बसवायचे अन् रस्त्यातच...; कुठे घडत होत्या धक्कादायक घटना?

'ती' जाहिरात ठरली पुरावा! हत्येच्या कटात अडकलेल्या अमृताला वडिलांनी १ वर्षापूर्वीच संपत्तीतून केले होते बेदखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2025 15:32 IST

दिल्लीतील तिमारपूर येथे यूपीएससी विद्यार्थी रामकेश मीणा यांच्या हत्येनंतर या प्रकरणाचे मुरादाबाद कनेक्शन समोर आले आहे.

UPSC aspirant murder case: दिल्लीतील तिमारपूर येथे यूपीएससीची तयारी करणाऱ्या रामकेश मीणा या विद्यार्थ्याच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा झाला असून, या हत्येचे थेट मुरादाबाद कनेक्शन समोर आले आहे. मुख्य आरोपी असलेली फॉरेन्सिक सायन्सची विद्यार्थिनी अमृता चौहान हिनेच, तिचे खासगी व्हिडीओ हटवण्यास नकार दिल्यामुळे रामकेशच्या हत्येचा क्रूर कट रचल्याचे दिल्ली पोलिसांनी स्पष्ट केले आहे. ६ ऑक्टोबर रोजी गांधी विहार येथील एका इमारतीत लागलेल्या आगीनंतर रामकेश मीणा यांचा जळालेला मृतदेह आढळला होता. या प्रकरणाच्या तपासात पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि मोबाईल लोकेशनच्या आधारे अमृता चौहान, सुमित कश्यप आणि संदीप कुमार या तिघांना अटक केली.

पोलिसांच्या चौकशीत अमृताने कबूल केले की, रामकेश मीणाकडे तिचे काही खासगी व्हिडिओ होते, जे तो डिलीट करत नव्हता. यामुळे संतापलेल्या अमृताने गुन्हेगारी मालिका पाहून हत्या करण्याची पद्धत शिकली आणि सुमित व संदीपच्या मदतीने रामकेशची हत्या केली. त्यानंतर या घटनेला अपघात भासविण्यासाठी आरोपींनी एलपीजी सिलेंडरच्या मदतीने इमारतीत स्फोट घडवून आणला होता.

वडिलांनी जाहिरात देऊन नाते तोडले

या प्रकरणातील मुख्य आरोपी अमृता चौहान हिच्याबाबत एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. अमृताच्या चुकीच्या आचरणाला कंटाळून तिच्या वडिलांनी जवळपास एक वर्षापूर्वीच तिच्याशी असलेले संबंध तोडले होते. अमृताच्या वडिलांनी ८ जुलै २०२४ रोजी एका वृत्तपत्रात संबंध नसल्याची जाहिरात दिली होती. या जाहिरातीत त्यांनी स्पष्ट केले होते की, अमृताला तिच्या चल-अचल संपत्तीतून बेदखल करण्यात आले असून, तिच्या कोणत्याही कृत्याला कुटुंब जबाबदार असणार नाही.वडिलांना असलेला हा 'संशय' आता हत्येच्या घटनेनंतर सत्यामध्ये बदलला. वडिलांनी दिलेली ही जाहिरात आता कोर्टात पुरावा म्हणून सादर करण्यात आली आहे.

रामकेशने १५ हून अधिक महिलांचे बनवले होते व्हिडीओ

रामकेश मीणासोबत अमृता मे महिन्यापासून लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रामकेश मीणाने अमृतासह १५ हून अधिक महिलांचे अश्लील व्हिडिओ बनवले होते. आता पोलीस या महिला कोण होत्या आणि रामकेशच्या संपर्कात कशा आल्या, याचा तपास करत आहेत. दरम्यान, आरोपी संदीप कुमारच्या वडिलांनी, "जर माझा मुलगा दोषी असेल, तर मी त्याच्या बाजूने नाही; पण निर्दोष असल्यास शेवटच्या श्वासापर्यंत त्याच्यासोबत राहीन," अशी प्रतिक्रिया दिली आहे. या तिन्ही आरोपींवर दिल्ली पोलीस सखोल तपास करत आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Advertisement Proves Plot: Father Disowned Daughter Before Murder Conspiracy.

Web Summary : Amrita murdered Ramkesh for refusing to delete private videos. Her father had disowned her a year prior due to her behavior, a fact now used as evidence. Ramkesh filmed over 15 women. Police investigate.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस