शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
5
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
6
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
7
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
8
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
9
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
10
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
11
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
12
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
13
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
14
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
15
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
16
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
17
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
18
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
19
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

चांगूर बाबाचे दुबईपर्यंत नेटवर्क; महाराष्ट्र-युपीतील 1500 हिंदू तरुणींचे धर्मांतरण, चौकशीत खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2025 15:44 IST

UP News: उत्तर प्रदेशातील चांगूर बाबा धर्मांतर प्रकरणात मोठा खुलासा झाला आहे.

UP News: उत्तर प्रदेशातील जमालुद्दीन उर्फ चांगूर बाबा धर्मांतर प्रकरणात मोठा खुलासा झाला आहे. बलरामपूर जिल्ह्यातील माधपूर येथील जमालुद्दीन आणि त्याची सहकारी नीतू उर्फ ​​नसरीन यांना अलीकडेच यूपी एटीएसने अटक केली. या बाबावर देशविरोधी कारवाया आणि बेकायदेशीर धर्मांतराचे आरोप आहेत. त्याच्या अटकेनंतर चौकशीत नवनवीन खुलासे होत आहेत. 

टीव्ही9हिंदीच्या वृत्तानुसार, चांगूर बाबाने 1500 हून अधिक हिंदू मुलींचे बेकायदेशीरपणे धर्मांतर केल्याचे समोर आले आहे. आता एटीएस बेकायदेशीर धर्मांतराला बळी पडलेल्यांचा पीडितांचा शोध घेत आहे. विशेष म्हणजे, चांगूर बाबाने यूपीतील बलरामपूर येथे येण्यापूर्वी महाराष्ट्रापासून ते दुबईपर्यंत आपले नेटवर्क तयार केले होते. त्याने महाराष्ट्रातही मोठ्या संख्येने धर्मांतर केल्याचे समोर आले आहे.

चांगूर बाबा मुंबईत अंगठ्या विकायचामीडिया रिपोर्ट्सनुसार, चांगूर बाबा मुंबईतील एका दर्ग्याबाहेर अंगठ्या विकायचा. काही वेळातच तो आखाती देशांतील अशा संस्थांच्या संपर्कात आला, ज्या हिंदूंचे इस्लाम धर्मात धर्मांततर करायच्या. बलरामपूरमध्ये आल्यानंतर त्याने येथे आणि आसपासच्या जिल्ह्यांमध्ये बेकायदेशीरपणे लोकांचे धर्मांतर करण्यास सुरुवात केली. त्याचे जवळचे नातेवाईक आणि अनुयायी वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन लोकांना इस्लाम धर्म स्वीकारण्यास प्रवृत्त करण्यासाठी कार्यक्रम आयोजित करायचे.

धर्मांतरासाठी प्रलोभने द्यायचा

आझमगडमध्ये बेकायदेशीरपणे लोकांचे धर्मांतर केल्याबद्दल बाबाच्या अनेक नातेवाईकांवर दोन वर्षांपूर्वी गुन्हा दाखल करण्यात आला होता. एसटीएफच्या तपास अहवालानुसार, बलरामपूर आणि त्याच्या आसपासच्या जिल्ह्यांमधील काही पोलिस-प्रशासन, एलआययू अधिकाऱ्यांनी पैशासाठी बाबाला मदत केली होती. बाबा बलरामपूर आणि त्याच्या आसपासच्या जिल्ह्यांची लोकसंख्या बदलू इच्छित होता. बाबा गैर-मुस्लिमांना इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी सर्व प्रकारे प्रलोभन देत असे.

न्यायालयाने बुधवारी चांगूर बाबा आणि त्याची जवळची सहकारी नीतू रोहरा उर्फ ​​नसरीन यांना एटीएसकडे सात दिवसांची कोठडी सुनावली आहे. दोघांचाही रिमांड कालावधी आजपासून, म्हणजेच गुरुवारपासून सुरू होईल. या काळात आयबी आणि एनआयएचे अधिकारी चांगूर बाबाची चौकशी करतील.

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशCrime Newsगुन्हेगारीMaharashtraमहाराष्ट्रMuslimमुस्लीमHinduहिंदू