शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

प्रियकराने स्वत:ला पेटवून घेत प्रेयसीला मारली मिठी, वादानंतर उचललं धक्कादायक पाऊल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2022 17:17 IST

Uttar Pradesh Crime News : असं सांगितलं जात आहे की, दोघेही मूकबधीर आहेत आणि दोघांची ऑनलाइन ओळख झाली होती. हळूहळू ही मैत्री वाढली आणि दोघे प्रेमात पडले.

उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) कानपूरमध्ये (Kanpur) प्रियकराने स्वत:ला पेटवून घेत प्रेयसीला मिठी मारल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दोघेही यात घटनेत गंभीर भाजले गेले आहेत. सध्या दोघांवरही हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. असं सांगितलं जात आहे की, दोघेही मूकबधीर आहेत आणि दोघांची ऑनलाइन ओळख झाली होती. हळूहळू ही मैत्री वाढली आणि दोघे प्रेमात पडले.

कानपूरच्या नौबस्तामध्ये राहणारा राम नारायणची मूकबधीर मुलगी रचनाची ऑनलाइन मैत्री जयपूरच्या विजयसोबत झाली होती. दोघांची मैत्री हळूहळू प्रेमात बदलली. पण काही दिवसांपासून दोघांमध्ये वाद सुरू होता. आज सकाळी विजय जयपूरहून कानपूरला आला आणि अंगावर पेट्रोल ओतून घेत रचना घरात शिरला.

काही वेळ दोघे बोलले. त्यानंतर विजयने स्वत:ला पेटवून घेतलं. आग लागल्यानंतर त्याने रचनाला जवळ घेतलं, ज्यामुळे ती सुद्धा भाजली गेली. दोघेही आगीत जळत असल्याचं पाहून तिथे एकच गोंधळ उडाला. त्यांना बघण्यासाठी लोकांनी गर्दी केली. दोघांना जखमी अवस्थेत हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. दोघांचीही स्थिती गंभीर आहे.

राम नारायण म्हणाला की, आज सकाळीच विजय जयपूरहून आला होता आणि त्याने घरात आल्यावर स्वत:ला आगीच्या हवाली केलं. डीसीपी रवीना त्यागी यांनी सांगितलं की, दोघांनाही हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. तरूण जास्त भाजला गेलाय, मुलीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून एफआयआर दाखल करण्यात आला आहे. 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशCrime Newsगुन्हेगारी