शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

ड्रायव्हर 'वराती'त नाचायला गेला, ज्याच्याकडे गाडीची चावी दिली त्याने वऱ्हाड्यांना चिरडले; अनेकांनी प्राण गमावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2023 12:40 IST

वरातीत सहभागी लोक डीजे वाजवत गाण्यांच्या तालावर नाचत होते. नाचणाऱ्यांची संख्या 30 ते 40 असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे वरातीत जीप चालवणाऱ्या चालकालाही नाचण्याचा मोह झाला

मध्य प्रदेशातील शिवपुरी जिल्ह्यात एका व्यक्तीने मिरवणुकीत नाचणाऱ्या लोकांना जीपने चिरडले. ही घटना २२ फेब्रुवारी रोजी घडली होती आणि ज्याची माहिती आता समोर आली आहे. जीप चालवणाऱ्या व्यक्तीला ती कशी चालवायची हेच माहित नसल्याचे आतापर्यंत केलेल्या तपासाच्या आधारे समोर आले. जीपवर ताबा ठेवता न आल्याने त्याची गाडी वरातीत घुसली अन् दोन जणांचा मृत्यू झाला तर आठ जण जखमी झाले.

अपघात कसा झाला?वृत्तसंस्था पीटीआयच्या वृत्तानुसार, जिल्ह्यातील श्यामपूर भागातून निघालेली वरात संपूर्ण संगीतासह खतौरा गावात पोहोचली होती. वरातीत सहभागी लोक डीजे वाजवत गाण्यांच्या तालावर नाचत होते. नाचणाऱ्यांची संख्या 30 ते 40 असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे वरातीत जीप चालवणाऱ्या चालकालाही नाचण्याचा मोह झाला आणि तो खाली उतरून वरातीत नाचू लागला. जाण्याआधी त्याने जीपची चावी त्याच्या ओळखीच्या व्यक्तीला दिली. पण ज्याच्या हाती चावी दिली होती त्याला गाडी नीट कशी चालवायची हे माहीत नव्हते. 

ड्रायव्हरची सीट ताब्यात घेतल्यानंतर त्या व्यक्तीने काही अंतरापर्यंत हळू हळू गाडी चालवली. पण अचानक त्याने एक्सलेटर जोरात दाबला आणि गाडीने वेग पकडला.  वाहन नियंत्रणात न आल्याने भरधाव वेगात गाडी वरातीत घुसली. यामुळे दोघांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून आरोपीला अटक केली.

पोलिसांनी काय सांगितले?शिवपुरी जिल्ह्यातील इंदर पोलिस स्टेशनचे प्रभारी केएन शर्मा यांनी लग्नाच्या मिरवणुकांना जीपने धडक दिल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. त्यांनी सांगितले की बुधवारी रात्री मिरवणुकीत 30-40 लोक नाचत होते. त्याचवेळी  जीपने अनेकांना चिरडले. एसएचओने पुढे सांगितले की, वाहन चालवणाऱ्या व्यक्तीला कसे चालवायचे हे माहित नव्हते. जखमींपैकी तिघांची प्रकृती गंभीर आहे. घटनेनंतर त्यांना शिवपुरी येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्याचवेळी, गंभीर जखमींना उपचारासाठी ग्वाल्हेरला पाठवण्यात आले. आरोपीची कसून चौकशी करण्यात येत आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशCrime Newsगुन्हेगारीAccidentअपघात