शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

स्कूलबस वाहकाचा अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2023 06:13 IST

वांद्रे परिसरात ११ वर्षीय मुलगा कुटुंबीयांसोबत राहण्यास आहे. गेल्या वर्षी १ सप्टेंबर ते ३१ डिसेंबरपर्यंत हे अत्याचार सुरू होते.

मुंबई : वांद्रे येथे ११ वर्षीय मुलावर अनैसर्गिक अत्याचार केल्याप्रकरणी एका खासगी शाळेच्या बस वाहकाला निर्मलनगर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहे. समीर अस्लम कुरेशी (वय २६ ) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

वांद्रे परिसरात ११ वर्षीय मुलगा कुटुंबीयांसोबत राहण्यास आहे. गेल्या वर्षी १ सप्टेंबर ते ३१ डिसेंबरपर्यंत हे अत्याचार सुरू होते. मुलाच्या आईने दिलेल्या तक्रारीनुसार, पोलिस अधिक तपास करत आहेत. आरोपीने वेळोवेळी मुलासोबत अश्लील चाळे करत त्याच्यासोबत अनैसर्गिक अत्याचार केले. ही बाब मुलाने आईला सांगताच त्यांनी मंगळवारी पोलिस ठाणे गाठून घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला.

त्यानुसार पोलिसांनी गुन्हा नोंदवत त्याला अटक केली आहे. कुरेशी हा एका शाळेच्या बसवर वाहक म्हणून कामाला आहे. त्याने शाळेतील कुठल्या विद्यार्थ्यांसोबत अश्लील वर्तन केले आहे का? याबाबतही पोलिस अधिक तपास करत आहेत. आरोपी पीडित मुलाच्या एका नातेवाइकाच्या जवळपास राहण्यास होता. मुलगा तेथे येताच तो त्याच्यासोबत अश्लील वर्तन करत होता. 

माझी होशील का? वाकोलामध्ये १७ वर्षीय मुलीचा पाठलाग करत प्रीतम यादव   याने ‘ये जाडे, ये मोटू, मला तू खूप आवडते, माझी होशील का, असे म्हणाला. मुलीच्या मावस भावाने याचा जाब विचारताच त्यालाही चाकूचा धाक दाखवून जिवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी वाकोला पोलिसांनी विनयभंगसह पोक्सो अंतर्गत गुन्हा नोंदवत यादवला अटक केली आहे.

१३ वर्षीय मुलगी राहिली गर्भवती लग्नाचे आमिष दाखवत १६ वर्षीय मुलाने १३ वर्षीय मुलीसोबत शारीरिक संबंध ठेवले. यामध्ये ती ६ महिन्यांची गर्भवती राहिल्याने कुटुंबीयांना धक्का बसला आहे. याप्रकरणी शाहू नगर पोलिसांनी जबरी संभोगासह पोक्सो अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी