शहरं
Join us  
Trending Stories
1
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
2
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
3
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
4
IND A vs SA A : पंत कॅप्टन्सीसह कमबॅक करणार! रोहित-विराट मात्र 'या' वनडे मालिकेपासून दूरच राहणार?
5
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
6
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
7
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
8
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
9
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
10
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
11
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
12
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
13
Student Death: स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सागरने आईच्या साडीनेच संपवले आयुष्य; एका तरुणीमुळे...
14
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा
15
Shocking: गंमत म्हणून विवाहित महिलेनं डीएनए चाचणी केली, सासराच निघाला बाप!
16
देव तारी त्याला कोण मारी! भीषण रेल्वे अपघातात ढिगाऱ्याजवळ जिवंत सापडला चिमुकला, पण...
17
भाजपाची महिला पदाधिकारी, नेत्यांना पुरवायची मुली; बिहार निवडणुकीत वरिष्ठांनी दिली जबाबदारी
18
श्रीदेवीचा सुपरहिट सिनेमा 'मॉम'च्या सीक्वेलमध्ये दिसणार 'ही' अभिनेत्री, सेटवरील फोटो लीक
19
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
20
तो, ती आणि प्रेमाची बहार! पांड्यानं शेअर केला गर्लफ्रेंडसोबतचा खास व्हिडिओ

Unnao Rape Case : कुलदीप सेंगरने सुनावलेल्या शिक्षेला दिले आव्हान, हायकोर्टाने सीबीआयला पाठवली नोटीस 

By पूनम अपराज | Updated: November 6, 2020 18:32 IST

Unnao Rape Case:  या प्रकरणात कुलदीप सिंग सेंगरसह एकूण सात दोषींना दहा वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. याशिवाय कोर्टाने दहा लाख रुपये दंडही ठोठावला.

ठळक मुद्देसीबीआयने आयएएस आदिती सिंग, आयपीएस पुष्पांजली सिंग आणि नेहा पांडे यांना या प्रकरणात दुर्लक्ष केल्याबद्दल दोषी ठरवत विभागीय कारवाईची शिफारस केली.

उन्नाव बलात्कार प्रकरणात पीडितेच्या वडिलांच्या मृत्यू प्रकरणात शिक्षा झालेल्या माजी आमदार कुलदीप सिंग सेंगर यांच्या याचिकेवर शुक्रवारी सुनावणी झाली. दिल्ली हायकोर्टाने आता या प्रकरणात सीबीआयला नोटीस बजावून उत्तर दाखल करण्यास सांगितले आहे.ट्रायल कोर्टाच्या आदेशास कुलदीप सेंगर यांनी आव्हान दिले होते. या प्रकरणात कुलदीप सिंग सेंगरसह एकूण सात दोषींना दहा वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. याशिवाय कोर्टाने दहा लाख रुपये दंडही ठोठावला. आता या प्रकरणाची सुनावणी 10 नोव्हेंबरला दिल्ली उच्च न्यायालयात होणार आहे.उन्नाव बलात्कार प्रकरणात कुलदीप सेंगर यांचे उत्तर प्रदेश विधानसभेचे सदस्यत्व 25 फेब्रुवारी रोजी रद्द करण्यात आले होते. एप्रिल 2018 मध्ये पीडित मुलीच्या वडिलांचा पोलिस कोठडीत मृत्यू झाला. ज्यानंतर यावर्षी मार्च महिन्यात न्यायालयाने कुलदीप सेंगर, त्याचा भाऊ आणि इतर पाच जणांना दोषी ठरवत शिक्षा ठोठावली.काही दिवसांपूर्वी या प्रकरणाची चौकशी करणार्‍या सीबीआयने मोठी कारवाई केली. या प्रकरणात सीबीआयने जिल्ह्यातील तत्कालीन उच्च अधिकाऱ्यांना दोषी धरले होते. सीबीआयने आयएएस आदिती सिंग, आयपीएस पुष्पांजली सिंग आणि नेहा पांडे यांना या प्रकरणात दुर्लक्ष केल्याबद्दल दोषी ठरवत विभागीय कारवाईची शिफारस केली.

Unnao Case : हत्येप्रकरणी माजी आमदार कुलदीप सेंगर दोषी, कोर्टाचा निर्णय

3 डिसेंबर 2019ला उन्नाव बलात्कार पीडितेची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात उपचार सुरु असताना हृदयविकाराचा झटका आल्याने तिचा मृत्यू झाला. बलात्कार प्रकरणात जामिनावर सुटलेल्या आरोपींनी पीडितेला सुनावणीसाठी जात असताना जिवंत जाळले. यात ती 90 टक्के भाजली होती. त्यानंतर सुरुवातीला तिला उपचारासाठी लखनऊच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर दिल्लीतील सफदरगंज रुग्णालयात हलविण्यात आले होते. सफदरजंग रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरु होते. तिची प्रकृती अत्यंत नाजूक असल्याने व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान तिने अखेरचा श्वास घेतला.

 

टॅग्स :Unnao rape caseउन्नाव सामूहिक बलात्कार प्रकरणCourtन्यायालयCBIगुन्हा अन्वेषण विभागKuldeep Singh Sengarकुलदीप सिंह सेनगर