Unnao Case : हत्येप्रकरणी माजी आमदार कुलदीप सेंगर दोषी, कोर्टाचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2020 02:32 PM2020-03-04T14:32:24+5:302020-03-04T14:44:16+5:30

Unnao Case : उन्नाव सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणी उत्तर प्रदेश पोलिसांच्या

Kuldeep Senger guilty of killing Unnao rape case victim's father | Unnao Case : हत्येप्रकरणी माजी आमदार कुलदीप सेंगर दोषी, कोर्टाचा निर्णय

Unnao Case : हत्येप्रकरणी माजी आमदार कुलदीप सेंगर दोषी, कोर्टाचा निर्णय

Next

मुंबई - उन्नाव बलात्कार आणि हत्याप्रकरणीतील पीडिताच्या वडिलांच्या हत्येबाबतच्या निर्णयावर आज न्यायालयात सुनावणी झाली. याप्रकरणी दिल्लीतील तीस हजारी कोर्टाने माजी आमदार कुलदीप सेंगर यांस सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्यात दोषी ठरवले आहे. मात्र, पीडितेच्या वडिलांना ठार करण्याचा हेतू आरोपीचा नव्हता, जमावाने केलेल्या अमानुष मारहाणीत त्यांचा मृत्यू झाला आहे, असे न्यायालयाने म्हटले आहे. 

माजी आमदार कुलदीप सिंह सेंगर हाच दोषी असल्याचा निर्णय कोर्टाने दिला. ज्या पद्धतीने हत्या करण्यात आली ती अत्यंत अमानुष होती, असं निरीक्षण नोंदवत दिल्लीतील तीस हजारी कोर्टाने कुलदीप सिंह सेंगरला दोषी ठरवलं. या प्रकरणात माजी आमदार कुलदीप सिंह सेंगरसोबत 11 आरोपी होते. त्यापैकी 4 जणांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. तर इतर 7 जणांना कोर्टाने दोषी ठरवलं. याप्रकरणी 12 मार्च रोजी शिक्षा सुनावली जाणार आहे. न्यायालयाने कलम 304 आणि कलम 120 ब अंतर्गत कुलदीपसिंह सेंगरला दोषी ठरवण्यात आलं.

भाजपाचा निलंबित आमदार कुलदीप सेंगर याने उन्नाव येथे एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची घटना 2017 साली घडली होती. याप्रकरणी 4 मार्चला न्यायालयात सुनावणी होती. तत्पूर्वी उन्नाव बलात्कार प्रकरणातील पीडित मुलीच्या वडिलांवर उपचार करणार्‍या डॉक्टर प्रशांत उपाध्याय यांचा सोमवारी सकाळी मृत्यू झाला. डॉ प्रशांत उपाध्याय हे ते डॉक्टर आहेत, ज्यांनी उन्नाव बलात्कार प्रकरणातील पीडितेच्या वडिलांवर उपचार केले होते.


उन्नाव सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणी उत्तर प्रदेश पोलिसांच्या एसआयटी पथकाने कोर्टात आरोपपत्र दाखल केले होते. 23 वर्षीय पीडित तरुणीवर सामूहिक बलात्कार केलेल्या नराधमांनी जामिनावर सुटून तिला जाळले. 90 टक्के भाजलेल्या तरुणीचा डिसेंबर 2019मध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्याअगोदरच, तिच्या वडिलांची हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी दिल्लीतील तीस हजारी कोर्टाने आज आरोपींना दोषी ठरवले आहे. याप्रकरणी शिक्षेसंबंधात पुढील अंतिम सुनावणी 12 मार्च रोजी होणार आहे. 

3 डिसेंबर 2019ला उन्नाव बलात्कार पीडितेची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात उपचार सुरु असताना हृदयविकाराचा झटका आल्याने तिचा मृत्यू झाला. बलात्कार प्रकरणात जामिनावर सुटलेल्या आरोपींनी पीडितेला सुनावणीसाठी जात असताना जिवंत जाळले. यात ती 90 टक्के भाजली होती. त्यानंतर सुरुवातीला तिला उपचारासाठी लखनऊच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर दिल्लीतील सफदरगंज रुग्णालयात हलविण्यात आले होते. सफदरजंग रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरु होते. तिची प्रकृती अत्यंत नाजूक असल्याने व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान तिने अखेरचा श्वास घेतला.

Web Title: Kuldeep Senger guilty of killing Unnao rape case victim's father

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.