शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
2
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
3
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
4
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
5
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
6
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
7
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
8
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
9
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
10
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
11
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
12
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
13
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
14
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
15
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
16
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
17
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
18
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
19
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
20
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?

माथेफिरूने ४० महिला पोलिसांना केले हैराण, व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप बनवून पाठवत होता अश्लील मेसेज 

By पूनम अपराज | Updated: December 4, 2020 21:58 IST

Cyber Crime : फिरोजाबादच्या हेड कॉन्स्टेबलच्या मुलीच्या हरवलेल्या फोनमधून माथेफिरुला या महिलांचे मोबाइल फोन नंबर मिळाले आहेत.

ठळक मुद्देरकाबगंज भागातील रहिवासी हेड कॉन्स्टेबल फिरोजाबादमधील पाचोखरा पोलिस ठाण्यात तैनात आहे.

आग्रा येथील ४० महिला पोलिसांसह इतर मुलींना एक माथेफिरू फोनवर कॉल करून घाणेरडे मेसेज करून त्रास देत आहे. त्यांचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप बनवून अश्लील मेसेज पाठवत होता. फिरोजाबादच्या हेड कॉन्स्टेबलच्या मुलीच्या हरवलेल्या फोनमधून माथेफिरुला या महिलांचे मोबाइल फोन नंबर मिळाले आहेत. त्याला हा हरवलेला मोबाइल सापडला आहे.

हेड कॉन्स्टेबलची मुलगी आधी एक पोलीस होती, परंतु नंतर पोलिस विभागाची नोकरी सोडून ती शिक्षिका झाली. सीतापुरात केलेल्या पोलीस शिपायाच्या प्रशिक्षणात तिच्या बॅचच्या महिलांचे मोबाइल नंबरही तिच्या फोनमध्ये सेव्ह होते. या प्रकरणाची फिर्याद एसपी क्राईमकडे नोंदविण्यात आली आहे. त्याने तपास सायबर सेलकडे सोपविला आहे.

रकाबगंज भागातील रहिवासी हेड कॉन्स्टेबल फिरोजाबादमधील पाचोखरा पोलिस ठाण्यात तैनात आहे. काही दिवसांनी तिच्या मुलीचे लग्न झाले आहे. हेड कॉन्स्टेबलने सायबर सेलमध्ये अर्ज दिला आहे. त्यात म्हटले आहे की, मुलगी 27 नोव्हेंबरला लुहार गली आणि पॉवर हाऊस येथे गेली होती. वाटेत तिचा फोन हरवला. मोबाईल चोरी झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. फोनमध्ये शंभराहून अधिक तरूणी, नातेवाईक, बहिणी आणि भाऊ आहेत. याशिवाय मुलीच्या बॅचच्या पोलिसांचे नंबरही आहेत.

तो पोलिसांची मुलगी असल्याचे बतावणी करून संवाद साधतो 

हेड कॉन्स्टेबलने सांगितले की, माथेफिरू आपली ओळख उघड करीत नाही. तो पोलिसांची मुलगी म्हणून बोलतो. मुलीने तिचे सिम ब्लॉक केले. यानंतर माथेफिरूने त्याचे सिम घातले आहे. मुलीने व्हॉट्स अॅप ग्रुप बनविला होता. त्या ग्रुपमधून नंबर घेऊन एक नवीन ग्रुप त्याने बनवला.तो मुलीच्या नावावर अश्लील मेसेज पाठवत आहे. तिच्या मैत्रिणींचे त्याला कॉल आले, त्यानंतर माथेफिरूची करतूत उघडकीस आली. ज्या नंबरवरुन त्याने मेसेज पाठवला त्या नंबरवर फोन केला असता तो कॉल रिसिव्ह करत नाही. मेसेजिंगवर पोलिसाची मुलगी असल्याचं भासवून नंबर बदलला असल्याचे उत्तर देतो.

200 सदस्यांचा  व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप बनवला, 140 जणांनी लेफ्ट केलाहेड कॉन्स्टेबलने सांगितले की, माथेफिरूने व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमध्ये 200 तरूणी आणि स्त्रिया जोडल्या आहेत. हे सर्व मुलीच्या मैत्रिणी आणि त्यांचे नातेवाईक आहेत. अशोभनीय संदेश पाहून त्यापैकी 140 जणांनी पोलिसाच्या मुलीला फोन करून माहिती दिली. जेव्हा त्याला कळले तेव्हा त्यांनी ग्रुप सोडला. तो व्हॉट्सअॅप कॉलिंग करतो. अ‍ॅपच्या मदतीने तो तरुणीचा आवाज काढून बोलायचा. माथेफिरूने स्वत: ला फतेहाबादचा असल्याचे सांगितले

हेड कॉन्स्टेबलच्या मुलीने माथेफिरुला मेसेज केला. त्याच्याशी गप्पा मारत आणि पत्ता विचारला असता त्याने सांगितले की, तो फतेहाबादचा रहिवासी आहे. हेड कॉन्स्टेबलनेही पोलिसांना याबाबत माहिती दिली आहे. आता पोलिस आरोपीचा शोध घेत आहेत.

टॅग्स :PoliceपोलिसUttar Pradeshउत्तर प्रदेशWhatsAppव्हॉट्सअ‍ॅप