शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

खळबळजनक! अंबरनाथमध्ये अज्ञात तरुणाची डोक्यात दगड घालून हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2022 17:24 IST

Murder Case : अंबरनाथ पश्चिम पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून मृत तरुणाची ओळख पटविण्याचे पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत. 

अंबरनाथ पश्चिमेच्या डीएमसी कंपनीच्या बाजूला असलेल्या मोकळ्या मैदानात एका अज्ञात तरुणाची डोक्यात दगड घालून हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. काल रात्रीच्या सुमारास तरुणाची हत्या झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अंबरनाथ पश्चिम पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून मृत तरुणाची ओळख पटविण्याचे पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत. 

अंबरनाथमध्ये नववर्षाच्या पहिल्याच रात्री काही व्यक्तीने एका तरुणाची दगडाने ठेचून हत्या केली ही घटना एक तारखेला रात्रीच्या सुमारास घडल्याची माहिती पोलिसांनी दिली. या तरुणाचं नाव रवी तिवारी असून तो ठाकुरपाडा परिसरातील रहिवासी आहे. अंबरनाथ डी एम सी कंपनीच्या शेजारी असलेल्या मोकळ्या भूखंडावर एका तरुणाचा मृतदेह आढळला आहे. या तरुणाची एक जानेवारी रोजी रात्री दगडाने ठेचून हत्या करण्यात आली होती. नेमका हा प्रकार का घडला आणि कोणी केला हे यक्बाबत अद्याप पोलीसही संभ्रमात आहेत.

डी एम सी कंपनीच्या शेजारी असलेल्या मोकळ्या भूखंडावर रात्रीच्या वेळेस तळीरामांचा आणि नशेखोर तरुणांचा वापर मोठ्या प्रमाणात असतो. ज्या तरुणाची हत्या करण्यात आली आहे त्या तरुणाचे नाव रविवारी असून तो अंबराच्या ठाकूर पाण्यात राहणारा आहे तसेच तो नियमित मजुरीची कामे करीत होता. त्याच्या चेहऱ्यावर मोठा दगड टाकून त्याचा चेहरा विद्रूप करण्यात आला आहे. हा प्रकार आपापसातील वादातून घडला आहे, की पूर्ववैमनस्यातून घडला आहे याचा पोलीस शोध घेत आहेत. या तरुणाच्या संपर्कात असलेल्या प्रत्येकाचे पोलिस कसून चौकशी करीत आहेत.

टॅग्स :Deathमृत्यूthaneठाणेambernathअंबरनाथPoliceपोलिस