शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

तरुणीचे एटीएम कार्ड बदलून अज्ञात चोरट्याने काढले 25 हजार रुपये 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2020 15:16 IST

ए टी एम सेंटर मध्ये आपल्या वडिलांचे पैसे काढण्यासाठी गेलेल्या एका 23 वर्षीय मुलीला अज्ञात चोरट्यांने मदत करण्याच्या नावाखाली चक्क 25 हजार रुपयांचा गंडा घालून पोबारा केला

वसई  - वसई पश्चिमेतील पार्वती क्रॉस स्थित युनियन बँक शाखेच्या ए टी एम सेंटर मध्ये आपल्या वडिलांचे पैसे काढण्यासाठी गेलेल्या एका 23 वर्षीय मुलीला अज्ञात चोरट्यांने मदत करण्याच्या नावाखाली चक्क 25 हजार रुपयांचा गंडा घालून पोबारा केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी फिर्यादी मुलीने माणिकपूर पोलिसांत हकीकत कथन केल्यावर पोलिसांनी त्या अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,एका 23 वर्षीय फिर्यादी मुलगी शनिवारी आपल्या वडिलांच्या खात्यातून काढण्यासाठी व एटीएमचा पासवर्ड बदली करण्यासाठी युनियन बँकेच्या पार्वती क्रॉस शाखेत गेली असता एका अनोळखी इसमाने फिर्यादी मुलीला सांगितले की, मी तुझे एटीएम पासवर्ड चेंज करण्यात मदत करतो असे सांगून ती मुलगी ते एटीएम कार्ड घेऊन अज्ञात चोरा सोबत एटीएम सेंटर्स मध्ये गेली. दरम्यान याच संधीचा फायदा घेत त्या चोरट्यांने ते एटीएम कार्ड बदलून फिर्यादी मुलीच्या  वडिलांच्या खात्यातून एकूण 25 हजार रुपये काढून तिची फसवणूक तर केली आणि तिथून पोबारा केला. परिणामी काही वेळाने ही घटना लक्षात आल्यावर आपली फसवणूक झाली हे असे समजल्यावर त्या मुलीने माणिकपूर पोलीस ठाण्यात धाव घेतली. अखेर पोलिसांनी दखल घेत अज्ञात चोरावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे

पालघर सायबर पोलिसांचे आवाहन पालघर जिल्ह्यातील सर्व नागरिकांना सायबर पोलिस दलाकडून आवाहन करण्यात येत आहे की अशा प्रकारच्या घटना विविध ठिकाणी घडत असून आपण एटीएम मशीनमधून पैसे काढत असताना इतर कोणत्याही व्यक्तीस आत किंवा सोबत घेऊ नये किंवा आपले एटीएम कार्ड दुसऱ्या व्यक्तीस देऊ नये व आपला एटीएम पिन कोड ही कुणाला सांगू नये,असे आवाहन सायबर पोलिस दल ,पालघर यांच्याकडून करण्यात आले आहे

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीVasai Virarवसई विरारatmएटीएम