पत्रकारावर अज्ञात इसमांनी केला गोळीबार; जखमी अवस्थेत रुग्णालयात केले दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2021 00:18 IST2021-11-17T00:11:16+5:302021-11-17T00:18:39+5:30
पालघर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून उपविभागीय पोलीस अधिकारी मिता पाडवी ह्यांही पोहचल्या आहेत.

पत्रकारावर अज्ञात इसमांनी केला गोळीबार; जखमी अवस्थेत रुग्णालयात केले दाखल
पालघर:- पालघर मधील जावेद लुलानिया (वय 53 वर्ष)ह्या पत्रकारावर त्याच्या चिकण च्या दुकाना जवळ उभे असताना मोटारसायकल वरून आलेल्या अज्ञात इसमानी केलेल्या गोळीबारात ते जखमी झाले आहेत. मंगळवारी रात्री १० च्या सुमारास ही घटना घडली. त्याच्या पाठीमागून गोळी छातीत घुसल्याची माहिती समोर येत आहे.त्यांना उपचारासाठी प्रथम पालघरच्या ढवळे रुग्णालयात नेले असताना त्याची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना अधिक उपचारासाठी मुंबईतील रुग्णालयात नेण्यात आले आहे.
पालघर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून उपविभागीय पोलीस अधिकारी मिता पाडवी ह्यांही पोहचल्या आहेत.त्यांनी आजूबाजूचे सीसीटीव्ही फुटेज तपासणीचे आदेश दिले आहेत.मोटारसायकल वर हेल्मेट घालून आलेल्या दोन अज्ञातांनी जवळून गोळी घातल्याची माहिती समोर येत आहे."पालघर नागरिक"ह्या साप्ताहिक वृत्तपत्राचे ते संपादक होते.ह्या हल्ल्या मागच्या कारणांचा पोलीस शोध घेत आहेत.