शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

बेराेजगार पित्याने मुलाचाच घेतला जीव! नाेकरी गेली, भीकही मागितली; अखेर उचलले पाऊल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2022 08:45 IST

आर्थिक तंगीमुळे एका पित्याने ११ महिन्यांच्या मुलाला नर्मदा कालव्यात फेकून ठार मारले. राजस्थानच्या जालौर जिल्ह्यातील सांचौर येथे ही काळीज पिळवटून टाकणारी घटना घडली.

सांचौर (जालौर) :

आर्थिक तंगीमुळे एका पित्याने ११ महिन्यांच्या मुलाला नर्मदा कालव्यात फेकून ठार मारले. राजस्थानच्या जालौर जिल्ह्यातील सांचौर येथे ही काळीज पिळवटून टाकणारी घटना घडली. मुकेश असे क्रूर पित्याचे नाव असून, तो गुजरातच्या बनासकांठा जिल्ह्यातील नलोधर गावचा रहिवासी आहे. 

आरोपीने दोन वर्षांपूर्वी प्रेमविवाह केला होता. कामधंदा नसल्याने घर चालविणे कठीण झाल्याने त्याने पोटच्या गोळ्याला संपविण्याचा कट आखला. मुलाला आजी-आजोबांकडे सोडण्याचा बहाणा करून तो पत्नी, मुलाला घेऊन गुजरातहून राजस्थानला आला. सिद्धेश्वर (सांचौर) गावात यात्रेकरूंसाठीच्या भंडाऱ्यात त्याने जेवण केले. पत्नीला खोटे सांगून तो मुलाला घेऊन गेला. काही अंतरावर जाऊन त्याने मुलाला कालव्यात फेकले. सात महिन्यांपूर्वी माझी सुरक्षारक्षकाची नोकरी गेली. कुटुंबाचा गाडा चालविण्यासाठी मी भीकही मागितली, असे मुकेशने सांगितले.

२० किमीवर मिळाला चिमुरड्याचा मृतदेहपोलीस मित्र काना राम (वय ४३) यांनी पती-पत्नीला मुलासह पाहिले होते. मात्र, थोड्या वेळाने या जोडप्याकडे मूृल नव्हते. संशय आल्याने त्यांनी सांचौर पोलिसांना याबाबत कळविले. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन विचारपूस केली, तेव्हा त्याने गुन्ह्याची कबुली दिली. सिद्धेश्वरपासून २० कि.मी.वर तेतरोल येथे या मुलाचा मृतदेह आढळून आला. 

टॅग्स :farmer suicideशेतकरी आत्महत्या