शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

मर्डर केला अन् विसरला, मग पूर्ण रात्र पत्नीच्या मृतदेहासोबत झोपला आणि मग....

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2022 12:08 IST

Delhi Crime News : घाबरून त्याने मित्राला फोन केला आणि सांगितलं की, पत्नीचा मृत्यू झाला. मित्राने पोलिसांना याची सूचना दिली. ज्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून आरोपीला अटक केली.

Delhi Crime News : दिल्लीच्या फतेहपूर बेरीमध्ये पतीने आधी पत्नीसोबत भरपूर दारू ढोसली. नंतर दोघांमध्ये जेवण वाढण्यावरून भांडण झालं. भांडण इतकं वाढलं की, पतीने पत्नीचं तोडं उशीने दाबलं. यात पत्नीचा श्वास गुदमरून मृत्यू झाला. पण पतीला हे माहीतच नव्हतं आणि तो रात्रभर मृतदेहासोबत झोपला. सकाळी जेव्हा त्याने पत्नीला उठवण्याचा प्रयत्न केला तेव्हा उठली नाही. घाबरून त्याने मित्राला फोन केला आणि सांगितलं की, पत्नीचा मृत्यू झाला. मित्राने पोलिसांना याची सूचना दिली. ज्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून आरोपीला अटक केली.

सुल्तानपूर परिसरातील ही घटना आहे. इथे 39 वर्षीय सोनाली पतीसोबत राहत होती. दोघांचं लग्न 2008 मध्ये झालं होतं. कोरोनामुळे लागलेल्या लॉकडाऊननंतर पती विनोद कुमारची नोकरी गेली होती. तेव्हापासून तो बेरोजगार होता. विनोद घरीच राहत होता. यादरम्यान त्याला दारूची वाईट सवय लागली.

असं सांगितलं जात आहे की, गुरूवारी रात्री विनोद दारू घेऊन आला होता. पती-पत्नीने मिळून दारू प्यायली. मग पत्नी सोनालीने जेवायला वाढलं. यावेळी जेवण वाढण्यावरून दोघांमध्ये भांडण झालं. वाद इतका वाढला की, रागाच्या भरात विनोदने सोनाली तोंड उशीने दाबलं. श्वास गुदमरल्याने सोनालीचा मृत्यू झाला. पण नशेत असल्याने विनोदच्या हे लक्षातच आलं नाही. तो रात्रभर सोनालीच्या मृतदेहासोबत झोपला होता.

सकाळी उठल्यावर त्याने पत्नी सोनालीला उठवण्याचा प्रयत्न केला. पण ती काही उठली नाही. नंतर समजलं की, तिचा मृत्यू झाला. घाबरून विनोदने मित्राला फोन केला आणि सगळं काही सांगितलं. मित्राने लगेच पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून विनोदला अटक केली. आता पुढील चौकशी सुरू आहे.

टॅग्स :delhiदिल्लीCrime Newsगुन्हेगारी