शहरं
Join us  
Trending Stories
1
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
2
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
3
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
4
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
5
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
6
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
7
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
8
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
9
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
10
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
11
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
12
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
13
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
14
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
15
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
16
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
17
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
18
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
19
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
20
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू

नोकरीच्या बहाण्याने तरुणांना घातला एक कोटींचा गंडा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2020 7:28 AM

फरार आरोपीस अटक : आर्थिक गुन्हे शाखा कक्ष २ ची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई  : रेल्वेत विविध पदांवर नोकरीला लावण्याचे आमिष दाखवून बेरोजगार तरुणांची फसवणूक करणाऱ्याला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्यावर खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून, दोन वर्षांपासून पोलीस त्याचा शोध घेत होते. दीपककुमार सिन्हा (४८) असे पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

दीपककुमार सिन्हामूळचा गुजरातच्या वडोदरा परिसरात राहणारा असून त्याने खारघर येथे कार्यालय थाटून हा अपहार केला होता. रेल्वेत विविध पदांवर नोकरीला लावण्याचे आमिष बेरोजगार तरुणांना देत त्याने लाखो रुपये घेतले होते. मात्र पैसे घेतल्यानंतर त्यांना बनावट नियुक्तिपत्र देऊन पोबारा केला होता. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर सिन्हाविरोधात खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या वेळी त्याने २२ हून अधिक तरुणांना १ कोटी ३ लाख ७९ हजार रुपयांचा गंडा घातल्याचे उघड झाले होते. मात्र त्याच्याविषयीची ठोस माहिती कोणाकडेच नव्हती. यामुळे आर्थिक गुन्हे शाखा कक्ष २चे पथक त्याचा शोध घेत होते.

दरम्यान, गुजरातमधील वडोदरा परिसरात रहात असल्याची माहिती समोर आली होती. त्यानुसार वरिष्ठ निरीक्षक विजय वाघमारे यांच्या पथकाने त्या ठिकाणी काही दिवस पाळत ठेवून सिन्हा याच्या मुसक्या आवळल्या. गुरुवारी त्याला अटक करण्यात आली असून, पोलीस अधिक तपास करीत आहेत. तर त्याने झारखंड व गुजरातमध्येही अशाच प्रकारे अनेकांना गंडा घातला असल्याचे समोर आले आहे.  

टॅग्स :fraudधोकेबाजीjobनोकरी