शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात अनियंत्रित स्टार बसची स्कार्पियोला धडक 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2020 23:24 IST

गिट्टीखदान चौकात अनियंत्रित स्टार बसने सिग्नलवर उभ्या असलेल्या स्कार्पियोला धडक दिल्यानंतर रोड डिव्हायडर, हायमास्ट लाईट आणि डिपीला धडक दिल्यामुळे खळबळ उडाली. ही घटना बुधवारी दुपारी १२.३० वाजता घडली.

ठळक मुद्देस्कार्पियो चालकासह तिघे जखमी

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : गिट्टीखदान चौकात अनियंत्रित स्टार बसने सिग्नलवर उभ्या असलेल्या स्कार्पियोला धडक दिल्यानंतर रोड डिव्हायडर, हायमास्ट लाईट आणि डिपीला धडक दिल्यामुळे खळबळ उडाली. ही घटना बुधवारी दुपारी १२.३० वाजता घडली.क्लार्क टाऊन येथील रहिवासी जितेश धवन स्कार्पियो क्रमांक एमएच ३१, डी. के-१३५७ ने गिट्टीखदान चौकाकडून न्यु काटोल नाक्याकडे जात होते. सिग्नल बंद असल्यामुळे जितेश गिट्टीखदान चौकात थांबले होते. त्यावेळी मागून आलेल्या स्टार बस क्रमांक एम. एच. ३१-सी. ए-६००९ च्या चालकाने स्कार्पियोला धडक दिली. स्टार बसचा वेग अधिक असल्यामुळे स्कार्पियोला धडक दिल्यानंतर स्टारबस रोड डिव्हायडरवर चढली. बसने रोड डिव्हायडर, हायमास्ट लाईट आणि डीपीचे नुकसान केले. या घटनेमुळे गिट्टीखदान चौकात खळबळ उडाली. बस पासून बचाव करण्यासाठी वाहनचालक इकडे तिकडे पळून गेले. यात स्कार्पियो चालक जितेश आणि बसमधील दोन प्रवासी जखमी झाले. गिट्टीखदान पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी बसचा चालक भूषण साहेबराव मानेकर (३०) यास ताब्यात घेतले. त्याने ब्रेक फेल झाल्यामुळे ही घटना घडल्याचे सांगितले. गिट्टीखदान पोलिसांनी भूषण विरुद्ध अपघाताचा गुन्हा दाखल केला. पोलिसांनी बसचे ब्रेक फेल झाल्याची पुष्टी केली आहे. मंगळवारी सकाळी म्हाळगीनगर चौकात याच पद्धतीने टिप्परच्या धडकेत दोन नागरिकांचा मृत्यू तसेच १० जण जखमी झाले होते.

टॅग्स :Accidentअपघातnagpurनागपूर